सिनेसृष्टीचे राजकारणासोबत नेहमीच एक वेगळं नातं राहील आहे. अनेक कलाकारांनी यापूर्वी राजकारणात प्रवेश केला आहे. काहींची हि राजकीय इनिंग फुलली तर काहींनी पुन्हा अभिनयाकडे जाण्याचा निर्णय घेतला. राजकारणात असाच एक सिनेसृष्टीतला मोठा चेहरा जोडला जाणार आहे. दिवंगत अभिनेता लक्ष्याची पत्नी प्रिया बेर्डे आता राजकारणात उतरणार आहेत.
राजकारणाचा सिनेसृष्टीतील पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगला उपयोग होईल. हि बाब लक्षात घेऊन मी या गोष्टीवर काम करण्यासाठी राजकारणात प्रवेश ठरवल्याचे प्रिया बेर्डे यांनी सांगितले. हे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा योग्य पक्ष वाटल्याने राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितले.
येत्या ७ जुलै रोजी प्रिया बेर्डे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. पुण्यात निसर्ग येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडेल.
प्रिया बेर्डे यांच्यासोबत अनेक कलाकार पक्षप्रवेश करणार आहेत. यामध्ये अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, लावणीसम्राज्ञी शंकुतलाबाई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, निर्माते संतोष साखरे, सुधीर निकम यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी चित्रपत आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी डॉ अमोल कोल्हे यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर ते खासदार बनले आणि आता ते राष्ट्रवादीचे एक महत्वाचे नेते बनले आहेत. प्रिया बेर्डे यांना देखील आता पक्षप्रवेश केल्यानंतर कोणती संधी मिळते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून लवकरच १२ आमदार निवडले जाणार आहेत. त्यात प्रिया बेर्डे यांना आमदारकीची संधी मिळू शकते.
प्रिया बेर्डे यांनी अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. बजरंगाची कमाल, धमाल जोडी, जत्रा, तु.का पाटील, रंपाट, रंगत संगत, अशी ही बनवा बनवी या सुपरहिट चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. राज्यपाल नियुक्त १२ जागांमध्ये ज्यात साहित्यिक, कलाकार, क्रीडा अशा क्षेत्रातील दिग्गजांना संधी देण्यात येते. या निमित्ताने प्रिया बेर्डे यांना ही संधी मिळू शकते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.