प्रेमाला वयाचे बंधन नसते असे म्हंटले जाते. याचाच प्रत्येय एका प्रेमप्रकरणातून आला आहे. ओक्लाहोमा मध्ये राहणाऱ्या एका ६० वर्षीय आजीला आपल्यापेक्षा ३९ वर्षांनी लहान असणाऱ्या एका मुलासोबत प्रेम झालं आहे. पाम शास्तीन नामक महिलेला २१ वर्षीय जोनाथन लेंगेविन याच्यावर प्रेम झालं आहे. दोघांची एंगेजमेंट देखील झाली असून लवकरच ते लग्न करणार आहेत.
परंतु दोघांच्या प्रेमामध्ये समाज मात्र अडथळा बनला आहे. लोकांना हि प्रेमकहाणी आवडलेली नाहीये. या महिलेने आपले प्रेम मिळवण्यासाठी आपलं घर नातेवाईक मित्र सर्वाना सोडून दिल आहे. जोनाथन हा पेशाने कॉम्पुटर इंजिनिअर आहे.
सहन करावा लागतोय लोकांचा त्रास-
६० वर्षीय पाम आणि २१ वर्षीय जोनाथन मागील २ वर्षांपासून एकत्र राहत आहेत. जोनाथन हा पामच्या नातवाच्या वयाचा आहे. त्या दोघांना मात्र वयाचा काही फरक वाटत नाही. ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. मात्र जेव्हा ते बाहेर फिरायला जातात तेव्हा त्यांना लोकं खूप वेगळ्या नजरेने बघतात. लोकं त्यांना अनेकदा टोमणे देखील मारतात. त्यांना मात्र याचा फरक पडत नाही. ते एकमेकांसोबत चांगले खुश आहेत.
अशी झाली भेट-
या प्रेमी युगुलाची भेट २०१८ मध्ये एका डेटिंग ऍपच्या माध्यमातून झाली. जोनाथनने त्याच्या प्रोफाइलवर त्याचे वय २१ असल्याचे लिहिले होते. पण फोटो बघून पामला तो २० पेक्षा कमी वयाचा वाटला. पण जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा तिला कळलं कि त्याचं वय हे १९ च आहे. त्याला जास्त वयाच्या महिलांना भेटणे बोलणे आवडायचे.
त्यांना सुरुवातीला वयाची अडचण वाटली. पण जसं जसं त्यांची चांगली ओळख झाली तसं त्यांना कळलं कि आपल्याला परफेक्ट जोडीदार मिळाला आहे. पामला देखील सुरुवातीपासून कमी वयाचे मुलं आवडायचे.
समाज बनला प्रेमात अडचण-
पाम जोनाथन सोबत संसार थाटू इच्छिते पण तिच्या कुटुंबियांना आणि मित्रांना मात्र हे मान्य नव्हतं. पामला २ मुली आहेत. ज्यांचे वय ३० वर्षापेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांना अनेक अडथळे येत होते. त्यामुळे पामने सर्वाना सोडून द्यायचा निर्णय घेतला. ती जोनाथन कडेच राहायला गेली.
दोघे आता सोबत राहतात. दोघांना फिरायला खूप आवडते. ते दोघे एकमेकांच्या गरजांची पूर्ण काळजी घेतात. दोघांचं नातं आता खूप घट्ट झालं असून त्यांनी एंगेजमेंट देखील केली आहे.