देशात घडलेल्या अनेक मोठ्या घटनांवर सिनेमे येणे हि काही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी असे अनेक सिनेमे येऊन गेले आहेत. देशाचे राजकारण आणि बॉलीवूडचे देखील चांगलेच नाते आहे. राजकारणात झालेल्या मोठ्या घटनांवर सिनेमे यायला देखील टाइम नाही लागत. नुकत्याच घडलेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षावर देखील आता सिनेमा येणार आहे.
गलवान खोऱ्यात आपले शौर्य दाखवलेल्या सैनिकांवर आता सिनेमा येणार आहे. बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगण हा सिनेमा बनवणार आहे. तरण आदर्शने याबद्दल आपल्या ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले कि अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर सिनेमा बनवणार आहे.
त्यांनी ट्विट करून म्हंटल आहे, ‘अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर सिनेमा बनवणार आहे. सिनेमाचे टायटल काय असेल हे अजून ठरले नाहीये. सिनेमात त्या २० सैनिकांची गोष्ट दाखवली जाणार आहे ज्यांनी चिनी सैनिकांचा धैर्याने सामना केला. सिनेमात कोण कलाकार असतील हे देखील अजून ठरले नाहीये’.
अजय देवगणने यापूर्वी असे अनेक सिनेमे बनवले आहेत जे सत्य घटनेवर आधारित आहेत. त्याच्या सिनेमातून अनेकवेळा देशभक्ती दाखवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या तान्हाजी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. तान्हाजी सिनेमा देखील तान्हाजी मालुसुरे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला सत्य घटनेवरील सिनेमा होता.
सैनिकांचे शौर्य पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणार असल्याने अजय देवगण नेमका हा सिनेमा कशाप्रकारे बनवतो याची उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी पाकिस्तानवर केलेल्या स र्जिकल स्ट्राईकवर सिनेमा बनवण्यात आला होता. उरी- द सर्जिकल स्ट्राइक हा सिनेमा हिट ठरला होता ज्यामध्ये विकी कौशल ने भूमिका साकारली होती.
चीन आणि भारताचे संबंध खूप ताणले गेले असून १५ जूनला भारत चीनच्या सैनिकांमध्ये हि झ डप झाली होती. भारताचे यामध्ये सुमारे २० जवान श हीद झाले होते. चिनी सैनिकांचे देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये चीनचे देखील ४० पेक्षा अधिक सैनिक मा रले गेल्याच वृत्त होतं. या घटनेवर आता सिनेमा बनत असल्याने सर्व जण याची वाट बघणार आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.