बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहचा पोस्टमोर्टम अहवाल समोर आल्यानंतर श्वास कोंडल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत्यूपूर्वी सुशांतने आपल्या डोक्यावरील सगळी कर्जे फेडून टाकली होती. याबाबतीत त्याच्या नोकरांनी सांगितले की सुशांतने काही दिवसांपूर्वीच सर्वांच्या कर्जाची परतफेड केली आहे. तसेच नोकरांना तो म्हणाला होता की “आता माझ्यावर कोणाचेही कर्ज नाही आणिमी तुमचा पुढचा पगार देऊ शकेन का ते मला माहित नाही.” आपल्या कर्जाबाबतीत देखील एवढा जागरूक असणारा सुशांत पाठीमागे किती संपत्ती सोडून गेला आहे ?
सुशांतकडे होत्या या महागड्या वस्तू
हिंदी मालिका कलाकार ते बॉलिवूड अभिनेता असा सुशांतचा प्रवास आहे. सुरुवातीच्या काळात सुशांत मुंबईच्या मालाड भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहायचा. २०१५ साली सुशांतने मुंबईमधील पाली हिल भागात २० कोटी रुपयांना एक पेंटहाऊस विकत घेतले होते. सुशांतच्या पार्किंगमध्ये त्याची स्वतःची मासेराती क्वाट्रोपोर्टो ही दीड कोटी रुपये किमतीची कार, एक रेंज रोव्हर कार आणि २५ लाख रुपये किमतीची एक बीएमडब्ल्यू K1300R बाईकदेखील होती. त्याच्याकडे १० लाख रुपयांचा एक ऍडव्हान्स टेलिस्कोप देखील होता.
सुशांत पाठीमागे इतकी संपत्ती सोडून गेला आहे
आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी सुशांत पाच ते सात कोटी रुपये, तर प्रत्येक जाहिरातीसाठी एक कोटी रुपये मानधन घ्यायचा. सुशांतने रियल इस्टेटमध्ये देखील आपले पैसे गुंतवले होते. दोन वर्षांपूर्वी तर सुशांतने चंद्रावर सुद्धा जमीन खरेदी केली होती, असे खरेदी करणारा तो पहिला हिंदी कलाकार होता. सुशांत एकूण ८० लाख डॉलर म्हणजेच जवळपास संपत्ती ६० कोटींहून अधिक किमतीची संपत्ती मागे ठेऊन गेला आहे.
आपल्यला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा.