बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी मुंबईमधील बांद्रा स्थित आपल्या राहत्या घरामध्ये आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने सर्वजण हैराण झाले आहेत. सुशांतने हे पाऊल का उचलले याची अद्याप काही माहिती समोर आली नाही. फक्त मागच्या सहा महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता एवढे समजले आहे. त्याबाबत तो उपचारही घेत होता. पोस्टमोर्टम रिपोस्ट आल्याशिवाय नेमकं काही सांगता येणार नाही.
सुशांतच्या मृत्यूबाबत प्राथमिक माहिती अशी आहे
सुशांत मुंबईच्या बांद्रा येथील माउंट ब्लँक अपार्टमेंटमध्ये राहत होता. पोलिसांनी त्याच्या घरात शोधाशोध केली असून कुठलीही चिट्ठी सापडली नाही. इतर कोणती संशयास्पद वस्तूही सापडली नाही. याआधारेच पोलिसांनी या प्रकरणाला सुसाईड मानत आहेत. सुशांतसोबत या ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये चार लोक राहत होते. दोन स्वयंपाकी – नीरज आणि केशव, हाऊसकीपर दीपेश आणि एक आर्ट डिझायनर. त्यांनीच १०८ क्रमांकावर कॉल करुन सुशांतच्या गळफासाबद्दल माहिती दिली होती.
आदल्या रात्री १३ जूनला सुशांतने आपल्या रजक अभिनेता मित्राला फोन केला होता, पण त्याने फोन उचलला नव्हता. त्यासोबतच सुशांतने साक्ली ९:३० वाजता आपल्या बहिणीला देखील फोन केला होता. दोघांमध्ये बोलणं झालं. पोलीस सुशांतच्या बहिणीच्या संपर्कात आहेत. १४ जूनच्या सकाळी जवळपास १० वाजता सुशांत आपल्या खोलीतून बाहेर आला. ज्यूस घेऊन तो पुन्हा खोलीत गेला. त्यानंतर बराच वेळ दार ठोठावूनही दरवाजा उघडलं नाही. त्यामुळे १२:३० वाजण्याच्या सुमारास दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला. पण दरवाजा तुटला नाही. मग शेजारच्या एका चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलावण्यात आले. त्याच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा सुशांत हे जग सोडून निघून गेला होता.