बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतने आत्महत्या केल्याने बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरली आहे. सुशांत सारख्या कलाकाराने हे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. अंकिता लोखंडे हिलादेखील सुशांतच्या निधनाची बातमी समजताच धक्का बसला.
सुशांत आणि अंकीताची जोडी
२००९ साली झी टीव्हीवर लागणाऱ्या पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून सुशांत आणि अंकिताची जोडी पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकली. या जोडीला प्रेक्षकांनीही चांगलेच नावाजले. २०१४ सालापर्यंत ही मालिका चालली. परंतु जवळपास ६ वर्षे सुशांत आणि अंकिता एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यांचे लग्न होणार असल्याबाबतही चर्चा झाल्या. २०१६ साली दोघांमध्ये ब्रेकअप झाले. तेव्हापासून सुशांत खचला होता. काही दिवसांपूर्वी अंकिताने साखरपुडा केल्याच्या बातम्या आल्या होत्या.
सुशांतच्या आत्महत्येपूर्वी अंकिताने ठेवलेल्या स्टेटसचा अर्थ काय ?
सुशांतच्या मृत्यूबाबत बातम्या यायच्या तीन तास आधी अंकिताने एक स्टेटस टाकले होते. ते स्टेटस असे होते, “God removes people from your life because he heard conversations that you didn’t hear.” याचा अर्थ होतो, “देव लोकांना आपल्या आयुष्यातून काढून टाकतो कारण देवाने ते बोलणे ऐकलेले असते जे तुम्ही ऐकलेले नसते.” या स्टेटसचा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध नसेल, परंतु लोकांना बोलायला काय जातं ?