सध्या कोरोना लढ्यामध्ये अभिनेता सोनू सूद लोकांची मदत करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय कुमारही सातत्याने मदतनिधी देत आहे. अजय देवगणने देखील BMC च्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेन्टिलेटर्सचा खर्च उचलला आहे.
शाहरुख खान लोकांना कोरोनाशी लढण्यासाठी मदत करत आहे. त्याने आतापर्यंत अनेक मदतनिधीत देणगी दिली आहे. अनेक मजुरांना त्याने आर्थिक मदत केली आहे. महाराष्ट्र व पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा कर्मचार्यांना त्याने ५०००० पीपीई किट देण्याची घोषणा केली आहे. आपले तीन मजली ऑफिसही त्याने बीएमसीला क्वारंटाईन सेंटर म्हणून दिले आहे.
काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मुझफ्फरपूर रेल्वे स्टेशनच्या फलाटावर एका महिलेचा मृतदेह पडला होता. त्या महिलेच्या चिमुकल्या मुलाला आपली आई वारली आहे याबद्दल कसलीही कल्पना नव्हती. अजाणतेपणी तो चिमुकला आपल्या आईच्या मृतदेहावर चादर पांघरण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समजले की ती महिला प्रवासी मजूर आहे. सर्वांना त्या चिमुकल्याबद्दल सहानुभूती वाटली. शाहरुख खाननेदेखील पुढे येऊन त्या चिमुकल्याला मदत केली.
शाहरुखने कशी आणि किती मदत केली ?
मुझफ्फरपूरच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील मूळचा व्हिडीओ पाहिल्यानंतर शाहरुख खानने आपल्या मीर फाउंडेशनच्या सदस्यांना याबाबत सूचित केले. त्यानुसार त्याच्या मीर फाउंडेशनने त्या मुलाचा शोध घेऊन त्याला दोन लाख रुपयांची मदत केली.
याविषयी ट्विटरवर शाहरुख लिहतो की, “या छोट्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी आमची मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो. आई वडील गमावल्याचे दुःख आम्ही समजू शकतो. त्या मुलाला आमचे प्रेम आणि सहकार्य आहे.” यानंतर मुलाच्या आजोबांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात त्या चिमुकल्याच्या आजोबांनी शाहरुख खानकडून दोन लाख रुपयांची मदत मिळाल्याचे सांगितले आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.