उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा असणारा किम जोंग उन आजारावर मात करुन स्वगृही परतला असून देशाचा कारभार करायला सज्ज झाला आहे. आज आपण किम जोंग उन जवळ असणाऱ्या काही भन्नाट गोष्टी पाहणार आहोत…
१) कुमसुसान पॅलेस : उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगच्या पूर्वेकडच्या भागात हा शानदार महाल असून त्याठिकाणी उत्तर कोरियाचा संस्थापक किम इल सुंग याची समाधी आहे. एखाद्या कम्युनिस्ट नेत्याला समर्पित केलेला हा आतापर्यतचा सर्वात मोठा महाल आहे. या महालाच्या उत्तर आणि पूर्व बाजूंना गुप्त भुयार आहे. २) हॉटेल रुयुगोंग : १०५ माजले असणारे हे जगातील सर्वात मोठे हॉटेल आहे. पिरॅमिड आकाराच्या या हॉटेलचे बांधकाम १९८७ मध्ये किम इल सुंगच्या काळात सुरु झाले. या हॉटेलचे काम अद्याप पूर्ण झाले नाही.
३) अवकाश शक्ती : किम जोंग ऊनकडे वेगवगेळ्या प्रकारची १००० विमाने आहेत. त्यामध्ये हल्ले करणारे हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने, प्रवासी विमाने आणि ड्रोन विमाने यांचा समावेश आहे. किम जोंग ऊनजवळ समः आणि AAA या अवकाश संरक्षण व्यवस्था आहेत. ४) स्काय रिसॉर्ट : किम जोंग उनच्या आदेशाने समुद्रसपाटीपासून १३६० मीटर उंचीवर मासिक नावाच्या ठिकाणी एक स्काय रिसॉर्ट बनवण्यात आले आहे. याठिकाणी हजारो पर्यटक येतात. याठिकाणी पर्यटकांसाठी १२० खोल्यांचे हॉटेलही आहे.
५) गुप्त मोबाईल नेटवर्क : किम जोंग उन आणि त्याच्या जवळच्या लोकांसाठी एक गुप्त मोबाईल नेटवर्क देखील आहे. सर्वसामान्य लोक या मोबाईल नेटवर्कचा वापर करु शकत नाहीत. ६) खाजगी बेट : उत्तर कोरियाच्या किनारी भागात एक गुप्त बेट आहे. किम जोंग उनचा नातेवाईक बनून उत्तर कोरियात गेलेल्या अनेक अमेरिकन सेलिब्रिटींना या बेटावर ठेवण्यात आले होते. ७) सैन्य जहाजे : उत्तर कोरियाच्या नाविक सैन्यदलात अनेक युद्धनौका, गस्ती नौका आणि मोठी सैन्य जहाजे समाविष्ट आहेत.
८) आलिशान कार : २०१४ साली किम जोंग उनने नुसत्या आलिशान कार्स विकत घेण्यासाठी जवळपास १२० कोटी रुपये खर्चले होते. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ लिमोजीन आणि अनेक स्पोर्ट्स कार आहेत. ९) पियानो : किम जोंग उन पियानोचा शौकीन असून त्याच्याकडे २० हुन अधिक पियानो आहेत. १०) पाणबुड्या : किम जोंग उनकडे अनेक रशियन पाणबुड्या आहेत.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.