भारतीय क्रिकेटच्या इतिहासाची पाने चाळायची झाली तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा उल्लेख केल्याशिवाय हा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने याच मैदानावर २०११ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना जिंकत २७ वर्षानंतर भारताला वर्ल्डकप मिळवून दिला होता. क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकरचा उदय आणि अस्त याच मैदानावर झाला. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा सहा चेंडूत सहा षटकारांचा विक्रम याच मैदानावर घडला. या वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीची कथा म्हणजे मराठी आणि गुजराती संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुजराती माणसाच्या नाकावर टिच्चून मराठी माणसाने केलेल्या कामाची कथा आहे.
भारतीय क्रिकेटचा इतिहास
ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यानंतर १७८४ साली कोलकाता येथे भारतीय भूमीवरील पहिला क्रिकेट सामना खेळला गेला. ब्रिटिश शासनकाळात भारतात क्रिकेटचा झपाट्याने प्रसार झाला. वेगवेगळ्या जिमखान्याचे संघ स्थापन झाले. १९२६ साली भारताला इंपिरियल क्रिकेट क्लबचे सदस्यत्व मिळाले. १९२८ साली BCCI ची स्थापना झाली. १९३२ साली लॉर्ड्स मैदानावर पहिल्यान्दा भारत-इंग्लंड यांच्यात कसोटी सामना झाला. १९५२ साली पहिल्यांदा भारताने कसोटी सामना जिंकला. १९७४ साली पहिल्यांदा भारताने वनडे सामना खेळाला.
कसे उभे राहिले वानखेडे स्टेडियम ?
क्रिकेटच्या प्रसारानंतर देशात क्रिकेट क्लब ऑफ ऑफ इंडिया आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, मुंबई क्रिकेट असोसिएशन सारख्या संस्था उभ्या राहिल्या. परंतु त्यावेळी मुंबई क्रिकेट असोसिशनच्या मालकीचे एकही मैदान नव्हते. त्यांना एखादा सामना खेळवायचा असेल तर क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडे ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये सामना खेळवण्यासाठी परवानगी मागावी लागायची. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र आणि गुजरातच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरुच होती. त्यावेळी क्रिकेट क्लब इंडियाचे अध्यक्ष विजय मर्चंट हे गुजरातीभिमानी व्यक्ती होते तर दुसऱ्या बाजूला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विदर्भातील शेषराव वानखेडे हे होते.
अशाच एका प्रसंगी शेषराव वानखेडे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन विजय मर्चंट यांच्याकडे क्रिकेट मैदानावर सामना भरवण्याबाबत परवानगी मागण्यासाठी गेले. पण मर्चंट यांनी पहिल्याच झटकायत वानखेडेंची मागणी धुडकावून लावली. वानखेडेंनी तिथेच या गुजराती मर्चन्टच्या समोर मुंबईत दुसरे मैदान उभे करण्याची शपथ घेतली आणि तिथून बाहेर पडले. वानखेडे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांकडे आले. त्यांना घडला प्रकार सांगितला. मुख्यमंत्र्यांनीही वानखेडेंची तळमळ पाहून मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमच्या जवळच दुसऱ्या मैदानासाठी जागा दिली.
वानखेडेंनीही गुजराती मर्चन्टच्या नाकावर टिच्चून ब्रेबॉर्न पेक्षा मोठे स्टेडियम उभे केले. हे स्टेडियम उभारण्यासाठी कष्ट घेणाऱ्या शेषराव वानखेडे यांचे नाव या स्टेडिअमला देण्यात आले. जानेवारी १९७५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर भारत वेस्टइंडीज यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. तेव्हापासून ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणारे सामने बंद होत गेले आणि वानखेडे स्टेडियम प्रसिद्धीला आले.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.