अलिकडच्या काळात टिकटॉकची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. तरुणांमध्ये व्हिडीओ बनविण्याची एक प्रकारची स्पर्धाच लागलेली दिसून येते. केवळ सर्वसामान्य लोकंच नाही, तर चित्रपट कलाकार, खेळाडू, अनेक सेलेब्रिटी लोकही वेळ काढून टिकटॉकवर नियमित व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतेच प्रसिद्ध युट्युबर कॅरीमिनाटी आणि प्रसिद्ध टिकटॉक सेलेब्रिटी आमिर सिद्दीकी यांच्यातील कलगीतुरा आपण पाहिला.
इतकेच नाही तर टिकटॉकवरील अजून एक सेलेब्रिटी फैसल सिद्दीकीच्या अॅसिड हल्ल्याचा प्रसार करणार्या व्हिडिओने महिलावर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आणि टिकटॉक इंडियाने त्याचे अकाउंट बंद केल्याची घटना घडली. टिकटॉक हे चायनीज अॅप आहे आणि कोरोना रोगाची उत्पत्ती चीनमधून झाली, याकारणाने भारतातील अनेक नेटिझन्सनि #BanTikTok हा ट्रेंड केला होता. तसेच गुगल प्ले स्टोअरवर टिकटॉक अॅप्लिकेशनला निगेटिव्ह रिव्हिव्ह देऊन त्याची रेटिंग कमी केली होती.
एकंदर टिकटॉकबाबत भारतामधून नकारात्मक सूर निघायला लागला आहे. अशामध्ये महाभारतातील “भीष्म पितामह” साकारणाऱ्या मुकेश खन्ना यांनीही त्यामध्ये आपला सूर मिसळला आहे.
काय म्हणत आहेत “भीष्म पितामह” मुकेश खन्ना ?
महाभारत मालिकेत ‘भीष्म पितामह’चे पात्र निभावणाऱ्या मुकेश खन्ना यांनी चायनीज अॅप टिकटॉकला निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे. शिवाय हे अॅप समाजात अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण पिढी रस्त्यावर उतरत आहे आणि या अॅपच्या वापरामुळे तरुण हाताच्या बाहेर जात आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
हे टाळण्यासाठी सर्वांनी आपल्या मोबाइलमधुन टिकटॉक डिलीट करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. टिकटॉकची टोलना चीनच्या कोरोना विषाणूशी करताना त्यांनी म्हटले आहे की, “टिकटॉक व्हिडिओ बनवण्याशिवाय जीवनात इतरही अनेक गोष्टी आहेत. मी आपणाला सुचवितो की आपण चिनी उत्पादनांची एक यादी तयार करा आणि ती वापरणे टाळा.”
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.