भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांनी ट्विटरवर एक ट्विट केले आहे ज्यामुळे देशभरात वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आपल्या ट्विटमध्ये चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले आहे, “अयोध्येमध्ये उत्खनन सुरु असताना सापडलेले अवशेष ओरडून सांगत आहे की हे अवशेष बुद्धांशी संबंधित आहेत. त्यामुळे आता UNESCO आणि पुरातत्व विभागाकडून खुलासा झाल्याशिवाय त्याठिकाणी होणारे कुठल्याही प्रकारचे बांधकाम तात्काळ थांबवले गेले पाहिजे. त्याठिकाणी बौद्ध स्थळ बनवण्यासाठी आम्ही लवकरच आंदोलनाला सुरुवात करत आहोत.”
कोण आहे चंद्रशेखर आझाद ?
चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हा उत्तरप्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील घडखौली गावातील एक दलित नेता आहे. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने सामाजिक कार्यात प्रवेश केला. आपल्या गावाबाहेरच्या वेशीवर ‘द ग्रेट चमार ऑफ घडखौली, आपका हार्दिक अभिनंदन करता है” असा फलक लावल्याने तो चर्चेत आला होता. दलितांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्याने २०१४ मध्ये भीम आर्मी ही संघटना स्थापन केली आणि त्या माध्यमातून ३०० शाळा सुरु केल्या. त्याची संघटना उत्तरेतील ७ राज्यांमध्ये दलितांवरील अत्याचाराच्या विरोधात काम करते. सहारनपूर जातीय हिंसा प्रकरणात त्याला अटक झाली होती.
अयोध्या उत्खननात नेमके काय सापडले ?
अयोध्येतील मंदिर-मस्जिद वादावर गतवर्षी सुप्रीम कोर्टाने विवादित जागा रामलल्लाची असल्याचा निकाल दिला आणि त्याठिकाणी राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर ११ मी २०२० पासून मंदिराच्या जागेपर्यंत जाण्यासाठी वाटेत असणारे अडथळे काढून सपाटीकरणाचे काम सुरु झाले. या सपाटीकरणादरम्यान त्याठिकाणी काही पुरातन अवशेष सापडले.
हे अवशेष बौद्ध धर्माशी निगडित असून ते सम्राट अशोककालीन असल्याचे दावे करण्यात येत आहेत. त्यावरुन नवा वाद भडकण्याची चीन आहेत. भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद याने या वादात उडी घेऊन युनेस्कोने या जागेचे निष्पक्ष उत्खनन करावे अशी त्याने मागणी केली आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.