काळाच्या ओघात आपल्या अवतीभवतीच्या अनेक गोष्टी बदलल्या आहेत. मानवाने एकविसाव्या शतकापर्यंत पल्ला गाठला आहे. आज प्रत्येक पिढी इतिहासामध्ये स्वतःला डोकावून पाहत आहे. परंतु यावरुन कोणती पिढी इतर पिढीपेक्षा अद्वितीय होती हे आपल्याला सांगता येईल का ? प्रत्येकाला या प्रश्नाचे उत्तर देताना आपलीच पिढी अद्वितीय आहे असे ठासून सांगायला आवडेल. पण ट्विटर युजर झाम्बियान इन्फ्लुएंसर याने १९८५ ते १९९५ दरम्यान जन्मलेले लोक खास आजपर्यंतचे सर्वात एकमेवाद्वितीय असे असल्याचा दावा केला आहे.
का आहेत १९८५ ते १९९५ दरम्यान जन्मलेले लोक सर्वात खास ?
झाम्बियान इन्फ्लुएंसरच्या मते १९८५ ते १९९५ दरम्यान जन्मलेलय लोकांची पिढी सर्वात खास आणि एकमेवाद्वितीय आहे. आपल्या दाव्याला बळकटी यावी म्हणून झाम्बियानने काही सक्षम असे मुद्देही मांडले आहेत. परंतु कुठल्याही निष्कर्षापर्यंत येण्यापूर्वी त्याने नेमकं काय म्हटलंय ते वाचूया.
१) १९८५ ते १९९५ दरम्यान जन्मलेले लोक दोन वेगवेगळ्या पिढ्यांच्या मध्ये जन्मले असल्याने खास आहेत. त्यापैकी पहिली पिढी ती जेव्हा इंटरनेट आणि तंत्रज्ञान नव्हते आणि दुसऱ्या पिढीत या दोन्हीही गोष्टी आहेत.
२) याआधीच्या पिढीला हार्ड वर्क करण्यामध्ये विश्वास वाटायचा आणि नंतरच्या पिढीला स्मार्ट वर्क करण्यामध्ये विश्वास वाटतो. ३) आधीच्या पिढीने रेडिओपासून ते व्हर्च्युअल अशा तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे टप्पे पहिले आहेत आणि नंतरच्या पिढीने थेट तंत्रज्ञान युगात जन्म घेतला.
४) आधीच्या पिढीला कुणीही सहज फसवू किंवा लुटू शकत होते, मात्र नंतरची पिढी याबाबतीत अधिक सजग आहे. ५) परंपरा पाळणे आणि बुद्धिप्रामाण्यवाद जपणे यात योग्यरीत्या संतुलन कसे ठेवावे हे १९८५ ते १९८५ दरम्यान जन्मलेल्या लोकांना माहित आहे. ते कुठलाही निर्णय आंधळेपणाने घेत नाहीत.
६) १९८५ ते १९८५ दरम्यान जन्मलेल्या लोकांनी औद्योगिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा काळ पाहिला आहे. एवढे असले तरी शेवटी प्रत्येक पिढी एकमेकाद्वितीय असते हे सांगायला झाम्बियान विसरला नाही.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.