तुम्ही चित्रपट रसिक आहे किंवा नाही परंतु तुम्हाला कळतय कि कोणता अभिनेता हा जबरदस्त आहे. एक जरी सिनेमा पाहिला तरी तुम्ही ठरवू शकता कि हा अभिनेता कसा आहे. त्यापैकीच एक चेहरा कोणीही याला बघितल तर खासरेच म्हणणार नवाझुद्दिन सिदिक्की….
चला बघूया नवाझुद्दिन अभिनेता कसा झाला त्याची संघर्षमय कहाणी…
९ भाऊ बहिणीत सर्वात मोठा नवाजुद्दिन याचा जन्म १९ मे १९७४ साली उत्तर प्रदेश मध्ये मुज्जफरनगर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव बुढाना येथे झाला. त्यांचे संपूर्ण बालपण व प्राथमिक शिक्षण याच गावात पूर्ण झाले.
अनेक लोकांना वाटत असेल कि नवाजूद्दीन हा एका गरीब कुटुंबातून आला असेल परंतु तसे काहीही नाही तो एका जमीनदार शेतकरी कुटुंबातील होता. परंतु स्वतःचे करीयर घडविण्याकरिता त्याने कुणाचीही आर्थिक मदत घेतली नाही त्यामुळे त्यावर अत्यंत वाईट आले व हेच दिवस त्याला कठोर बनवत गेले.
नावाजूद्दीन ला लहानपणापासून शहराची ओढ लागली होती. कारण त्याला शिक्षण घ्यायचे होते व गावात शिक्षणाच्या सोई सुविध्या उपलब्ध नव्हत्या. इथे फक्त त्यांना तीनच गोष्टी माहित होत.
गेहू,गन्ना आणि गन
त्यामुळे पुढील शिक्षणाकरिता त्याने हरिद्वार येथे Gurukul Kangri Vishwavidyalaya मध्ये BSc Chemistry ला प्रवेश घेतला व शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने वडोदरा गुजरात येथील एका कंपनीत केमिस्टची नौकरी करण्यास सुरवात केली. परंतु त्याला या नौकरीत रस नव्हता एक दिवस अचानक त्याचा मित्र त्याला गुजराती नाटक दाखविण्यास घेऊन गेला.
नावाजुद्दिन पहिल्यावेळेसच अस काही बघत होता या अगोदर त्याने गावात B Grade, C Grade सिनेमे बघीतले होते जसे रंगा खुश , बिंदिया और बंदुक इत्यादी. परंतु हे वेगळच आहे, त्याला यामध्ये रस निर्माण झाला. हेच आपल्याला करायचे आहे हे त्याने ठरविले.
त्याने मित्राला मनातील गोष्ट बोलून दाखवली तर मित्राने त्याला सांगितले कि अभिनय शिकायला दिल्ली जावे लागेल.
नवाजुद्दिन आपली नौकरी सोडून दिल्लीला प्रस्थान केले. तिथे हि रोज नाटके बघितली व अभिनय शिकायला National School of Drama (NSD) येथे प्रवेश घेण्याकरिता पर्यंत सुरु केले. इथे प्रवेशाकरिता अनुभव आवश्यक आहे त्या करिता त्याने Sakshi Theatre Group नावाच्या संचात काम करायला सुरवात केली यामध्ये त्यांच्या सोबत मनोज वाजपेयी , सौरभ शुक्ला हि सोबत होते.
सकाळ संध्याकाळ फक्त अभिनय तो करत राहिल व शिकत राहिला. १९९६ मध्ये त्याचे NSD मधील शिक्षण पूर्ण झाले.विजय राज व राजपाल यादव त्याच्या सोबतच येथून निघाले. NSD नंतर तो ४ वर्ष दिल्लीला राहिला. अनेक पथ नाट्य, नाटक इत्यादी मध्ये त्याने काम केले. परंतु या सर्वातून पैसा मिळत नव्हता. म्हणून त्याने ठरविले उपाशीच मारायचे आहे तर मुंबईला जाऊन मरुया. आणि २००० मध्ये ते मुंबई इथे आले.
मुंबई येथील एका NSD मधील सिनियर ला त्याने मदत मागितली आणि तोही तयार झाला परंतु शर्तीवर कि त्याने स्वयंपाक बनवायचा. मेल्यापेक्षा हे बर ! नावाजुद्दिन तयार झाला. त्यानंतर त्याने अनेक जागेवर पर्यंत केले काही tv सिरीयल मध्ये त्याला काम मिळाले.
नावाजुद्दिन सांगतो कि “ त्या वेळेस सिरीयलसुध्दा सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्यांना दिले जायचे मला घ्याच म्हटल तर २,४ जास्तीची लाईट लावायची व्यवस्था करावी लागली असती.”
आणि आता नवाजूद्दीनच्या ऑफिसपुढे अनेक producer,directors चक्करा मारत असतात.
अब नवाज़ुद्दीन producers, directors के offices के चक्कर काटने लगे।
“कोणी विचारल काय करतोस तर मी सांगत होतो अभिनेता आहो यावर लोक हसायचे”
प्रत्येक जागेवर त्यांना रिजेक्ट करण्यार आले. याची सवयच पडली होती. पहिला ब्रेक त्याला मिळाला मग आमीर खानचा चित्रपट सरफरोश मध्ये ४० सेकंदाचा रोल होता तो ज्यामध्ये एका छोट्या आरोपीस पकडून पोलीस चौकशी करतात.
आणि त्याने हा रोल स्वीकारला. आणि त्यानंतर अशेच छोटे रोल तो करत राहिला कधी वेटर कधी चोर कधी भिकारी. सचिन आलारे या जाहिरातीमध्ये त्याला धोबीच रोल मिळाला ज्याचे त्याला ५०० रुपये मिळाले.
असे रोल करताना तो चेहरा लपवत असे तो म्हणतो “माझा चेहरा असा गरीब होता म्हणून लोग मला गरीबाची भूमिका नेहमी देत असे.”
अनेक वर्ष निघून गेली नवाजूद्दीन ला मनासारखे काम मिळाले नाही. लोग त्याची खिल्ली उडवत म्हणत असे “आता डीसकवरी टीव्हीवर जनावरे हि दिसत आहे तू कधी दिसणार”
त्यानंर सर्वाना मिळाला फैझल म्हणजेच गैंग ऑफ वासेपूर
कहानी, गैंग्स ऑफ़ वासेपुर,तलाश, द लंचबॉक्स, किक, बदलापुर, बजरंगी भाईजान, मांझी ह्या सिनेमाने आता नवाजूद्दीन ला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या अभिनयाकरिता संपूर्ण जग वाहवाह करत आहे.
नवाजुद्दिन सिद्दिकीच्या या २० वर्षाच्या संघर्षास खासरे तर्फे सलाम…
वाचा सिनेअभीनेत्यांना लाजवेल असा पोलीस अधिकारी…