बॉलिवूडचे कलाकार थिएटरच्या पडद्यावर एकदम परफेक्ट दिसतात. परंतु त्यांचे दैनंदिन आयुष्य एकदम आपल्यासारखेच असते. बॉलिवूडच्या आपल्या आवडत्या कलाकारांनाही आपल्यासारख्याच विचित्र सवयी आहेत. कोणत्या ते पाहूया…
१) सुष्मिता सेन : कदाचित सुष्मिता सेनची ही सवय किंवा छंद आहे असं म्हणता येणार नाही, परंतु तिला सापांबद्दल खूप प्रेम आहे. एकदा तिने अजगर पाळला होता.सुष्मिताला उघड्यावर आंघोळ करायला आवडते. तिच्या घराच्या छतावर बाथटब बसवण्यात आला आहे. २) आमिर खान : मिस्टर परफेक्शनिस्ट आणि पाणी फाउंडेशनचा जनक असलेल्या आमिर खानला आंघोळ करायला आवडत नाही. ३) सैफ अली खान : छोटे नवाब सैफ अली खानने बाथरूममध्ये आपला बराच वेळ घालवतात. त्याच्या बाथरूममध्येच एक लायब्ररी आहे.
४) सलमान खान : सलमान खानला अनेक चांगले छंद आहेत. पण आपल्याला माहित नसलेली सलमान खानचा छंद किंवा सवय म्हणजे सलमानला साबणा गोळा करायला आवडतात. सलमान संपूर्ण जगभरात फिरत असताना जाईल तिथे हॅण्डमेड, हर्बल साबणांपासून ते डिझाइनर साबणा गोळा करत असतो. ५) जितेंद्र : अभिनेता जितेंद्रची ही सवय जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. जितेंद्रला कमोडवर बसून फळ खाण्याची सवय आहे.
६) सनी लिओनी : सनी लिओनीला वारंवार पाय धुण्याची सवय आहे. शूटिंगदरम्यान चित्रीकरणाला थोडाही उशीर झाला तर ती दर १५ मिनिटाला पाय धुण्यास जाते. ७) करीना कपूर : करीना कपूर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जरी चांगली आणि व्यवस्थित पोशाखात दिसत असली तरी तिला एकांतात नखे चघळण्याची सवय आहे. ८) शाहरुख खान : शाहरुख खान लक्झरी आयुष्य जगतो आणि त्याला एक विचित्र सवय आहे. शाहरुख कधीही घरात चपला काढत नाही. कधीकधी तो शूज घालूनच झोपी जातो.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.