अमेरिकेत कोरोनाने अक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमित लोकांची संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. अशा अवघड परिस्थितीतही कोरोना योद्धे पुढे येऊन लोकांची सर्व प्रकारची मदत करण्यासाठी एकत्र आले आहेत. खरं तर हे कोरोना योद्धे आपल्या जीवाची बाजीच लावत आहेत असं म्हणणं अतिशोयक्ती होणार नाही. अशा या कोरोना योद्ध्यांना मदत करणाऱ्या एका १० वर्षांच्या भारतीय-अमेरिकन मुलीचा डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच गौरव केला आहे.
कोण आहे ती भारतीय-अमेरिकन मुलगी ?
त्या भारतीय-अमेरिकन मुलीचे नाव श्रव्या अन्नापारेड्डी असे असून ती केवळ दहा वर्षांची आहे. श्रव्याचे आई वडील मूळचे भारतातील आंध्रप्रदेशातील आहेत. श्रव्या मेरीलँड येथे राहते आणि मेरीलँडच्या हॅनोव्हर हिल्स इलिमेंटरी स्कुलस्कुलमध्ये चौथ्या वर्गात शिकते. शाळेतील एका “गर्ल्स स्काऊट तुकडी”ची ती सदस्यही आहे.
कशाबद्दल डोनाल्ड ट्रम्प आणि श्रव्याचा गौरव केला ?
श्रव्या आणि तिच्या स्काऊट तुकडीतील इतर दोन मैत्रिणीनी कोरोना संक्रमित लोकांची मदत करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे तोंड गोड करण्यासाठी आपल्या हातांनी बनवलेली ग्रीटिंग कार्ड्स आणि बिस्किटे पाठवली होती. श्रव्या आणि तिच्या मैत्रिणींनी एकत्र येऊन कोरोना रोगाविरुद्ध लढा देणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि अग्निशामक दलामध्ये काम करणाऱ्या लोकांना १०० बिस्किटांची पाकिटे आणि २०० ग्रीटिंग कार्ड्स पाठवले होते. विशेष बाब म्हणजे या सगळ्या गोष्टी मुलींनी स्वतःच्या हातांनी बनवल्या होत्या.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.