२०२० सालच्या पद्मा पुरस्कार वितरणामध्ये ११८ लोकांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. यामध्ये अशीही काही नावे आहेत ज्यांच्याबद्दल कधी चर्चा झाली नाही, पण आपले काम ते योग्यरीत्या करत असतात. त्यामध्येच एक नाव आहे शरीफ चाचा ! लोक मेल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे दफन किंवा अंत्यसंस्कार करण्याचे काम मागच्या २७ वर्षांपासून ते करत आहेत. त्यांनी आतापर्यंत साडे पाच हजारांहून अधिक बेवारस मृतदेहांवर दफनविधी किंवा अंत्यसंस्कार केले आहेत.
कोण आहेत शरीफ चाचा ?
अयोध्येतील खिडकी अली बेग मोहल्ल्यात राहणारे मोहम्मद शरीफ यांनाच शरीफ चाचा या नावाने जाते. ते ८२ वर्षांचे आहेत. मूळचे फैझाबादचे रहिवासी असणारे शरीफ चाचा मागच्या २७ वर्षांपासून ते काम करत आहेत जे करायला लोक कचरतात. मृत्यूनंतर एखाद्या अनोळखी सन्मानाने जगाचा निरोप देण्यासाठी शरीफ चाचा दफनविधीचे खड्डे खणण्यापासून ते मृत्यूनंतरच्या विधीचे साहित्य गोळा करण्यापर्यंतची कामे ते करतात. त्यांनी आतापर्यंत ३००० बेवारस हिंदूंवर अंत्यसंस्कार केले असून २५०० हुन अधिक बेवारस मुस्लिम व्यक्तींना दफन केले आहे.
मुलाच्या खुनानंतर बेवारस मृतदेहांची जबाबदारी स्वीकारण्याची घेतली होती शपथ
शरीफ चाचा बेवारस मृतदेहांना मानसन्मानाने जगाचा निरोप देण्यामागे एक दुःखद कहाणी आहे. शरीफ यांचा मुलगा मेडिकल सेवेत कमला होता. एकदा तो सुलतानपूरला गेला असताना त्याचा खून झाला आणि त्याचा मृतदेह निर्जनस्थळी फेकण्यात आला. कुटुंबीयांनी त्याचा खूप शोध घेतला पण मृतदेह सापडला नाही. तेव्हापासून शरीफ चाचांनी बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार आणि दफनविधी करण्याची शपथ घेतली. आपली शपथ ते आजदेखील पाळत आहेत.
आपल्यला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका…