रेल्वे स्थानकांवर त्वरित वैद्यकीय अहवाल देण्यासाठी भारतीय रेल्वेने आरोग्य एटीएम हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातुन आता रेल्वे प्रवाशांना त्यांची संपुर्ण वैद्यकीय तपासणी अअत्यंत कमी किंमतीत करता येणार आहे. विनाभाडे महसूल (नॉन-फेअर रेव्हेन्यु) मिळविण्यासाठी रेल्वेने “न्यु इनोव्हेटिव्ह अँड आयडिया स्कीम’ अंतर्गत हे आरोग्य ATM स्थापित केले आहेत. पाहूया सविस्तर…
रेल्वेमध्ये १० वर्षांपूर्वीच आली होती नॉन-फेअर रेव्हेन्यूची संकल्पना
नॉन-फेअर रेव्हेन्यूची सुरुवात सर्वप्रथम २०१०-११ मध्ये झाली होती. परंतु त्यानंतर अनेक वर्षे रेल्वेला त्या संकल्पनेचा पुरेपूर लाभ घेता आला नाही. मात्र मागच्या वर्षी रेल्वेला या उपक्रमाच्या माध्यमातुन चांगलीच कमाई झाली. अत्यंत कमी खर्चात संपुर्ण शरीराची तपासणी होऊन काही सेकंदातच आपला वैद्यकीय अहवाल मिळत असल्याने प्रवाशांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
केवळ ६० रुपयांमध्ये मिळते ही माहिती
आरोग्य ATM मशीनच्या माध्यमातुन संपुर्ण शरीराची तपासणी केली जाते. तपासणीनंतर एक प्रिंटेड स्लिप निघते, ज्यावर संपूर्ण वैद्यकीय माहिती देण्यात आलेली असते. या मशीनच्या साहाय्याने शरीरातील मास इंडेक्स आणि हायड्रोजन पातळीविषयी माहिती मिळते. शरीरातील रक्तदाब, रक्तातील साखरेची आणि प्रोटीनचे प्रमाण देखील समजते. केवळ ६० रुपये खर्च केल्यावर रेल्वे त्यांच्या प्रवाशाला ही सर्व माहिती देते. याउलट एखादा पॅथॉलॉजिस्ट याच कामासाठी किमान २०० रुपये घेतो.
आरोग्य ATM च्या मदतीने होते १६ प्रकारची तपासणी
रेल्वेने त्यांच्या अहवालात सांगितले आहे आहे की त्वरित वैद्यकीय अहवाल देण्यासाठी या यंत्रांमध्ये “पॉईंट ऑफ केअर डिव्हाइसेस अँड सॉफ्टवेअर” इन्स्टॉल करण्यात आलेआहे. या आरोग्य ATM च्या मदतीने एकावेळी १६ प्रकारच्या तपासण्या केल्या जाऊ शकतात. या कारणामुळेच भारतीय रेल्वेने अत्यंत माफक दारात प्रवाशांना आरोग्य ATM उपलब्ध करुन दिले आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला आपल्याकडील खास माहिती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.