पहिल्या नजरेत प्रेम झाल्याचे प्रसंग आपण अनेक चित्रपटात पाहिले असतील. अनिल अंबानी यांची प्रेमकथाही अशाच कुठल्यातरी चित्रपटापेक्षा कमी नव्हती. देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकाचा मुलगा असणाऱ्या अनिल अंबानीचा जीव बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनिमवर जडला होता. पाहूया अनिल अंबानी-टिनाची प्रेमकहाणी…
अनिल अंबानी पहिल्याच नजरेत टीनावर भाळले होते
अनिल अंबानी एका लग्नात गेलेले असताना त्यांनी टीना मुनिमला तिथे पहिल्यांदा पाहिले आणि पहिल्याच नजरेत अनिल टीनाच्या प्रेमात पडले. परंतु अनिल अंबानींच्या कुटुंबियांना टीनाचे अभिनेत्री असणे आवडत नसल्याने त्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. त्यामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाला.
भूकंपाने दोघांना आणले एकत्र
१९८९ साली अमेरिकेच्या लॉस एंजेल्समध्ये एक मोठा भूकंप झाला होता. त्यावेळी टिना देखील तिथेच राहत होती. ही खबर मिळताच अनिल अंबानींनी त्वरित टिना मुनीमचा नंबर शोधून काढला आणि तिला फोन तिची ख्यालीखुशाली विचारली. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा एकदा बोलणं सुरु झालं. शेवटी अनिल अंबानींच्या आग्रहापुढे कुटुंबाला गुडघे टेकले. त्यानंतर १९९१ मध्ये अनिल अंबानी आणि टिना मुनीम यांचे लग्न झाले आणि दोघे कायमचे एकमेकांचे बनले.
एकेकाळी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानींचे नाव देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये घेतले जायचे, परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. भारताच्या दूरसंचार मार्केटमध्ये अनेक संकटे उद्भवल्याने २०१२ सालापासून त्यांची संपत्ती सातत्याने खाली येत आहे. अनिल अंबानी यांच्या साधेपणाबद्दल टीना सांगतात, “मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा त्यांचा साधेपणा पाहून मी प्रभावित झाले. मला तो खूप सच्चा आणि प्रामाणिक माणूस वाटला. मी त्याआधी भेटलेल्या माणसांसारखा तो नव्हता. आम्ही दोघेही गुजराती भाषेमध्ये आपापसात बोल्ट असायचो.”
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला आपल्याकडील खास माहिती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.