बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आपला ४१ वा वाढदिवस १७ डिसेंबर रोजी साजरा करत आहे. रितेशने १६ वर्षांपूर्वी “तुझे मेरी कसम” या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. विनोदी चित्रपटात रितेशने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने मस्ती, क्या कूल है हम, मालामाल विकली, हे बेबी आणि हाऊसफुल सारख्य चित्रपटात काम केले आहे. बॉलिवूडमध्ये त्याची गणना “फॅमिली मॅन” अशी केली जाते. आज आपण रितेश आणि जेनेलिया यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेणार आहोत…
रितेश आणि जेनेलिया “तुझी मेरी कसम” या चित्रपटाच्या शूटिंगवेळी हैदराबादच्या विमानतळावर पहिल्यांदा भेटले होते. रितेशला आधीच सांगण्यात आले होते की चित्रपटाची हिरॉईन त्याची वाट पाहत आहे, परंतु रितेश जेव्हा विमानतळावर उतरला तेव्हा जेनेलियाने वागणे पाहून त्याला आश्चर्य वाटले. जेनेलियाला रितेश हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याचे आधीच सांगण्यात आले होते. जेनेलियाला वाटले की त्याला भरपूर अहंकार असेल. त्यामुळे रितेश देशमुखने भाव खायच्या आधी आपणच त्याला भाव द्यायला नको असा तिने विचार केला.
रितेशने आल्याआल्या जेनेलियाशी हॅन्डशेक केला. त्यानंतर जेनेलिया हातांची घडी घालून इकडेतिकडे बघायला लागली. पहिल्या भेटीतच जेनेलियाने असा भाव खाणे रितेशला आवडले नाही. पण जेव्हा चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले तेव्हा जेनेलियाला खात्री पटली की रितेश खरोखरच स्वभावाने चांगला आहे. त्यानंतर दोघांमध्ये मैत्र झाली. सेटवर २४ वर्षांचा रितेश १६ वर्षांच्या जेनेलियामध्ये खूप गप्पा चालायच्या. शूटिंग संपल्यानंतर दोघे जेव्हा आपापल्या घरी गेले तेव्हा त्यांना एकमेकांची उणीव भासायला लागली.
रितेश आणि जेनेलियाला एकमेकांच्या मैत्रीची इतकी सवय झाली होती की ते प्रेमात कधी पडले ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. पहिल्या चित्रपटापासूनच सुरु झालेले त्यांच्यातील नाते त्यांनी बाहेर कळू दिले नाही. त्यांच्या मते त्यांच्यातील नात्याचे सौंदर्य हेच होते की त्यांना एकमेकांच्या प्रेमात गुंतण्यासाठी कधीही महागड्या भेटवस्तू किंवा कॅण्डल लाईट डिनरची आवश्यकता पडली नाही. अखेरीस दहा वर्षांच्या मैत्रीनंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी त्यांचे लग्न झाले. २०१४ मध्ये त्यांना रियान नावाचा मुलगा झाला तर रितेशला २०१६ मध्ये दुसरा मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी राहील ठेवलं.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.