अभिषेक बच्चन नाव आले कि ऐश्वर्या राय आणि अमिताभ हे दोन नाव पुढे येतात. या शतकातील महानायक अमिताभ यांचा मुलगा आणि विश्वसुंदरी ऐश्वर्याचा नवरा अभिषेक सर्वाना माहिती आहे. परंतु सिनेसृष्टीत अभिषेक यांचे काम लोकांना जास्त रुचले नाही. त्यामुळे तो पडद्यापासून अनेक दिवसापासून दूर आहे.
अनेक लोक त्याला twitter वर हा प्रश्न विचारून त्रास देतात आणि तो देखील या सर्व ट्रोलना सडेतोड उत्तर देतो. परंतु अभिषेक हा एक चांगला उद्योगपती आहे हि बाजू त्यांची अनेकांना माहिती नाही आहे. आता बघूया नक्की अभिषेक यांची कुठल्या व्यवसायात भागीदारी आहे आणि तो कोणता उद्योग करतो.
अभिषेकला खेळात आवड आहे. प्रो कब्बडी लीग मध्ये अभिषेकची टीम जयपूर पिंक पैथर चांगले प्रदर्शन करते. तो या टीमचा मालक आहे आणि अनेक कंपन्या सोबत त्यांचे काम चालते. २०१४ साली सुरु झालेल्या इंडियन सुपर लीग फुटबॉल मध्ये देखील त्याची टीम आहे. Chennaiyin FC हि देखील टीम त्याने विकत घेतलेली आहे. या टीममध्ये त्याच्या सोबत भागीदार महेंद्रसिंग धोनी आणि विटा दानी हे आहे.
या सोबत अभिषेक हा अनेक मोठ्या कंपनीचा ब्रांड अम्बेसेडर आहे जसे एलजी होम अप्लायन्स, अमेरिकन एक्प्रेस कार्ड, व्हिडीओकोण डीटीएच, मोटोरोला, फोर्ड कार, आयडिया मोबाईल , ओमेगा घड्याळ, प्रेस्टीज इत्यादी कंपनी साठी तो काम करतो.
Meridian Tech Pte या कंपनीमध्ये अभिषेक आणि अमिताभ यांनी १.६० करोड रुपये गुंतवणूक केली आहे. LongFin या कंपनीचे ११२ करोड एवढा नफा त्यांना मिळवून दिला होता. तसाच अभिषेक हा चित्रपट निर्माता देखील आहे. त्याच्या पा चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.