बॉलीवूडचे प्रसिद्ध नाव जग्गू दादा आता ६२ वर्षाचे झाले आहे. १९८२ साली आलेला देवानंद यांचा सिनेमा ‘स्वामी दादा’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. परंतु त्यांचे नाव सुभाष घाई यांचा चित्रपट “हिरो” मधून प्रसिद्ध झाले. हिरो सिनेमा ब्लॉकबस्टर हिट होता. त्यानंतर त्यांनी कर्मा, राम-लखन, त्रिदेव, परिंदा, सौदागर, खलनायक आणि रंगीला सारख्या प्रसिद्ध सिनेमात काम केले. जैकी यांनी आत्तापर्यंत ११ भाषेतील २२० सिनेमात काम केले आहे. परंतु जैकी श्रॉफ यांचे नाव जग्गू दादा कसे पडले हे माहित आहे का ? याच्या मागे देखील एक किस्सा आहे.
संपूर्ण बॉलीवूड आणि त्यांचे चाहते जैकी श्रॉफला जग्गू दादा नावाने हाक मारतात. परंतु या मागे एक वाईट अनुभव आहे तर असे आहे कि जैकी श्रॉफ जेव्हा १० वर्षाचे होते तेव्हा त्यांचा मोठा भाऊ वयाच्या १७ व्या वर्षी पाण्यात डुबून मृत्यू झाला. काही दिवसा अगोदर सिमी गीरेवाल यांच्या यांच्या कार्यक्रमात त्यांनी हा किस्सा सांगितला कि त्यांचा मोठा भाऊ चाळीचा “जग्गू दादा” होता. कोणालाही काही मदत लागल्यास तो करत असे, एक दिवस समुद्रात एका मुलाचा जीव वाचविताना त्याचा मृत्यू झाला त्या वेळेस जैकी श्रॉफ हि तिथे होते परंतु त्यांना पोहता येत नसल्याने काय करायचे हे समजले नाही.
तेव्हापासून तो जग्गू दादा या भावाच्या नावाने सर्वाना मदत करत होता. लहानपणी तो घरून श्रीमंत नव्हता चाळीतला मुलगा ते बॉलीवूड स्टार त्याचा हा प्रवास अतिशय संघर्षमय होता. तसा जैकी श्रॉफचा परिवार हिरे व्यापारी होते परंतु धंद्यात घाटा झाल्याने त्याच्या वडिलास धंद्यातून बाहेर काढले.
त्यानंतर ते मलबार हिल जवळ एका छोट्याश्या भाड्याच्या खोलीत रहायला लागले. इथेच जैकी श्रॉफ यांचा जन्म झाला वयाचे ३० वर्ष त्यांनी या छोट्याश्या घरात काढली. आजही रोज अंघोळ झाल्यावर जैकी श्रॉफ आपल्या आईच्या फोटोच्या पाया पडतात. आणि त्यांना सूर्य दाखवितात कारण जैकी श्रॉफची आई रोज सूर्याची पूजा करत होती.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com इमेल आयडीवर पाठवू शकता.