१९८९ मध्ये मुंबईमधील बांद्रा लिंकिंग रोडवरती “पत्थर के फुल” चित्रपटाची शूटिंग सुरु होती. चित्रपटाचे निर्माते विवेक सिप्पी जवळच्याच एका कॉफी शॉपमध्ये बसुन काचेतून शूटिंग पाहत बसले होते. तेवढ्यात एक वेटर त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “दुसऱ्या टेबलवर एक टीव्ही कलाकार बसला आहे. त्याला सिगरेट पाहिजे.
इथे जवळपास कुठेही सिगरेट मिळत नाही.” विवेक सिप्पींनी सिगरेट दिली. थोड्या वेळाने परत एकदा वेटर सिगरेट मागायला आला आणि सिप्पींनी परत एकदा सिगरेट दिली. तिसऱ्या वेळेस स्वतः तो टीव्ही कलाकार सिप्पींकडे आला आणि दोघात चर्चा सुरु झाली. तो कलाकार दूरदर्शनवरील “सर्कस” मालिकेत काम करण्यासाठी दिल्लीवरुन मुंबईला आला होता आणि त्याचे नाव होते शाहरुख खान !
शाहरुखने दोन वर्षे ठोकला सिप्पींच्या घरी मुक्काम
“पत्थर के फुल”ची शुटिंग संपल्यानंतर विवेक सिप्पी पॅकअप करुन आपल्या चमूसोबत “एबीस” चित्रपट पाहायला निघाले होते, तेवढ्यात शाहरुखने मी सुद्धा येतो म्हणुन तो ही त्यांच्यात सामील झाला. चित्रपट संपला. शाहरुखने राहत असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी विवेककडे १०० रुपये मागितले, पण विवेककडचे पैसे संपले होते. विवेकने शाहरुखला त्याच्या घरी नेले. आजची रात्र इथेच झोप म्हणुन सांगितले. पण तेव्हापासून दोन वर्षे शाहरुख विवेक सिप्पींकडेच राहिला.
आईचा मृत्यू आणि शाहरुख बॉलिवुडमध्ये
सर्कस मालिकेच्या शुटिंगमधून वेळ काढून शाहरुख दिल्लीला गेला आणि तिथून त्याने विवेकला फोन केला आईची तब्येत खराब आहे. औषधे पाहिजेत. विवेकने औषधे खरेदी करुन अनेकदा शाहरुखच्या रमन नावाच्या मित्राजवळ पाठवून दिली. दोन-चार वेळा असे झाल्यानंतर विवेक स्वतःच दिल्लीला शाहरुखच्या आईला भेटायला गेले.
तेव्हा शाहरुखची आई कोमात गेली होती. विवेक परत मुंबईला आला आणि तिकडे शाहरुखच्या आईचे निधन झाले. त्यानंतर धार्मिक विधी उरकुन एके दिवशी शाहरुख कुणालाही न सांगता मुंबईला आला. पहाटे चार वाजता विवेकच्या घराची बेल वाजवली. दरवाजा उघडला. पण शाहरुख म्हणाला,
मी तोपर्यंत आत येणार नाही जोपर्यंत विवेक माझ्यासोबत चित्रपट काढणार नाही. विवेकने हो म्हटले आणि दोघे ताज हॉटेलजवळ कॉफी प्यायला गेले. बोलता बोलता त्यांना “राजू बन गया जंटलमॅन”ची कल्पना सुचली. चित्रपटाच्या शुटिंग झाली. चित्रपट रिलीज झाला. तुफान चालला आणि शाहरुखला एकामागून एक चित्रपट मिळत गेले. आज अमिताभ बच्चन यांच्यानंतर शाहरुख हा बॉलिवुडमधील सर्वात यशस्वी अभिनेता मानला जातो.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.