स्टार प्रवाह वरील “जय मल्हार” मालिकेतून इशा केसकर “बानुबाई”च्या रुपात घराघरात लोकप्रिय झाली. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर ईशाला लगेच “झी मराठी” वरील “माझ्या नवऱ्याची बायको” मधील “शनाया”ची भूमिका मिळाली. निस्वार्थी बानुबाई नंतर मस्तीखोर शनायाच्या रुपातही इशा केसकरने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. तिच्या या नव्या भूमिकेचेही प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले..
तर अशा या आपल्या घराघरातील लाडक्या बानुबाई उर्फ शनाया उर्फ इशा केसकरला तिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील खंडेराया किंवा गॅरी भेटला आहे. जाणून घेऊया ईशाची लव्हस्टोरी…
कोण आहे ईशाचा बॉयफ्रेंड ?
लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी ईशा आपल्या चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. मागे तिने तिच्या आवडीनिवडी, नातेसंबंधाबद्दल माहिती दिली होती. त्यात तिने तिच्या बॉयफ्रेंड बद्दलही सांगितले होते. झी मराठी वरील “काहे दिया परदेस” मालिकेत शिव ही भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि इशा केसकर मागच्या दोन वर्ष किंवा त्याहून अधिक काळ एकमेकांना डेट करत असल्याची बातमी आहे. दोन वर्षांपूर्वी ऋषी सक्सेनाने इंस्टाग्रामवर टाकलेल्या दोघांच्या एका फोटोला “Its been a while now” म्हणजे याला खूप काळ झाला अशे कॅप्शन दिले होते. इशादेखील दोघांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
अशी झाली होती ईशा आणि ऋषींची पहिली भेट
कुठल्याही प्रेमप्रकरणाच्या सुरुवातीला होणारी पहिली भेट कारणीभूत असते, ईशा आणि ऋषींच्या बाबतीतही तसेच घडले. झी मराठीच्या “चला हवा येऊ द्या” कार्यक्रमाच्या मंचावर ईशा आणि ऋषी पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते असे ईशाने सांगितले आहे. तिथूनच त्यांच्यात प्रेम बहरायला लागले.
मागे एकदा एका चाहत्याने तुझी फेव्हरेट डिश कोणती असा प्रश्न केला होता. त्यावर ईशाने ऋषी सोबतच फोटो शेअर करुन त्यावर “हा आणि सगळं स्वीट” असे उत्तर दिले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.