१९६६ मध्ये प्रबोधनकार ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसाला केंद्रबिंदू मानून शिवसेनेच्या राजकारणाला सुरुवात झाली. नंतरच्या काळात शिवसेना आक्रमक हिंदुत्वाकडे वळले आणि बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट बनले. बाळासाहेबांच्या भाषणांमधून सर्रास मुस्लिम विरोधी शाब्दिक हल्ले केल्याचे आढळते. पण दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांचे अनेक मुस्लिम शिवसैनिकही होते ही गोष्ट आजही अनेकांना माहित नाही. हिंदुत्व ही शिवसेनेच्या राजकारणाचा एक भाग असला तरी बाळासाहेबांनी शिवसैनिकांमध्ये कधीही जात धर्म न बघता त्यांना पदे दिली, त्यांची कामे केली.
देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांवर बाळासाहेब प्रेम करायचे
बाळासाहेबांनी त्यांच्या कित्येक भाषणांमधून सांगितले होते की, “मी किंवा माझा शिवसैनिक हिंदुस्थानवर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांविरोधात कधीही नव्हतो, नाही आणि नसणार. परंतु हिंदुस्थानात राहून हिंदुस्थानच्या विरोधात कारवाया करणाऱ्या मुस्लिमांच्या आम्ही विरोधात आहे.” मातोश्रीवर एखादा मस्लिम शिवसैनिक बाळासाहेबांना भेदायला गेला आणि नमाजाची वेळ झाली तर मातोश्रीवर नमाज पठणासाठीही सोय केयी जायची; याचे चित्रण “ठाकरे” बायोपिकमध्ये आपण पहिले आहे. झहीर खानला पाकिस्तान दौऱ्यावेळी जेव्हा बाळासाहेबांबद्दल प्रश्न विचारला होता, तेव्हा त्याने सांगितले होते “बाळासाहेब मुस्लिमविरोधी नाहीत, काही लोकांनी त्यांची प्रतिमा तशी बनवली आहे.”
बाळासाहेबांच्या एका फोनमुळे मन्या सुर्वेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन झाले होते रद्द
मुंबईतील पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वे याचा एन्काउंटर केलेल्या इसाक बागवान या पोलीस अधिकाऱ्याने त्यांचण्या पुस्तकात एक किस्सा सांगितलं आहे. महाराष्ट्रात युतीची सत्ता असताना मुंबईत एका महामानवाची विटंबना झाल्याने दंगल भडकली होती. छगन भुजबळांनी शिवसेनेवर प्रखर टीका केल्याने शिवसैनिक चिडले होते. भुजबळांच्या बंगल्यावर शिवैनिक हल्ला करणार असल्याची बटमो पोलीस अधिकारी इसाक बागवान यांना समजताच ते भुजबळांच्या घराला संरक्षण देण्यासाठी पोचले. शिवसैनिकांचा जमाव भुजबळांच्या बंगल्यावर आला. मुख्यमंत्री मनोहर जोशींनी जमावाला लाठीहल्ला करु नका असा आदेश दिला तर गृगमंत्री गोपीनाथ मुंडेंनी जमावावर लाठीचार्ज करा असा वेगवेगळा आदेश दिल्याने बागवान संभमावस्थेत पडले.
दरम्यान जमावाने भुजबळांच्या बंगल्यात घुसून तोडफोड सुरु केली. मोठा गोंधळ झाला. या घटनेचा ठपका ठेऊन इसाक बागवान यांना निलंबित करण्यात आले. इसाक बागवानांनी थेट मातोश्री गाठली आणि बाळासाहेबांना आपल्यावर अन्याय झाल्याची कैफियत ऐकवली. बाळासाहेबांनी तात्काळ मुख्यमंत्री मनोहर जोशींना फोन लावला आणि आपल्या ठाकरी शैलीत सुनावले, “सरकार गेले खड्ड्यात, यामध्ये या मुलाची काय चूक आहे ? याला का निलंबित केलंय ? जे झाले ते खूप झाले, हे सगळं आताच्या आता थांबलं पाहिजे.” बाळासाहेबांनी फोन ठेवताक्षणीच इसाक बागवानांचे निलंबन रद्द झाले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.