बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील कलाकार आज भलेही करोडपती बनले असले तरी यापैकी अनेकांना आपल्या सुरुवातीच्या काळात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी याच कलाकारांना प्रत्येक पैसा मौल्यवान वाटत होता.
अर्थातच आज त्या कलाकारांकडे जगातील कुठलीही वस्तू विकत घेण्याची क्षमता आहे. पण त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्यांच्या पहिल्या कमाईतून मिळालेल्या काही रुपयांचा आनंद त्यांच्यठी फार मोठा होता. आपली ही पहिली कमाई या बॉलिवूड कलाकारांनी कशी खर्च केली हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही चकित व्हाल…
१) शाहरुख खान : बॉलिवूडचा “किंग खान” शाहरुख आज निश्चितच कोट्यावधी रुपयांचा मालक आहे. पण त्याचा पहिला पगार जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. वास्तविक गझल गायक पंकज उदास यांच्या मैफिलीमध्ये काम केल्याबद्दल शाहरुख खानला ५० रुपये मिळाले होते. हीच शाहरुखची पहिली कमाई होती. आपल्या पहिल्या कमाईतुन शाहरुखने ताजमहाल पाहण्यासाठी तिकीट विकत घेतले होते.
२) कल्कि कोचलिन : बॉलिवूडमधील प्रतिभासंपन्न कलाकारांच्या यादीत समाविष्ट असलेली कल्की कोचलिन कदाचित फारच कमी लोकांना माहित असेल. पण तिने बॉलिवूड विश्वात स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. एका मुलाखतीत कल्कीने तिच्या आयुष्यातील तो क्षण सांगितलं होता जेव्हा तिला तिचा पहिला पगार मिळाला होता. कल्कीने आपल्या पहिल्या पगारापासून ती राहत असणाऱ्या घराचे भाडे दिले होते.
३) इरफान खान : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खानने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, जेव्हा तो हायस्कूलमध्ये होता तेव्हा त्याने काही अतिरिक्त पैसे मिळवण्यासाठी ट्युशन्स क्लास घेतले. त्यातून पहिल्या महिन्यात त्याला २५ रुपयांची कमाई झाली. आपल्या पहिल्या कामे मधून इरफानने स्वतःसाठी एक सायकल विकत घेतली.
४) अर्जुन कपूर : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर बॉलिवूडमध्ये काही खास प्रभाव निर्माण करू शकला नाही. परंतु वयाच्या १८ व्या वर्षी अर्जुन कपूरने ३५ हजार रुपये कमावले होते. आपल्या पहिल्या कमाई मधून अर्जुनने ‘कल हो ना हो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल अडवाणी यांना आर्थिक मदत केली होती.
५) रणदीप हूडा : सरबजित, हायवे, जिस्म २ अशा बॉलिवूड चित्रपटाद्वारे लोकांची मने जिंकणार्या अभिनेता रणदीप हुड्डाने ऑस्ट्रेलियामध्ये रिक्षाची साफसफाई पहिली कमाई केली होती. या कामासाठी त्याला ४० ऑस्ट्रेलियन डॉलर मिळाले होते. आपल्या पहिल्या कमाईतून त्याने एक भांडे विकत घेतले होते.
६) हृतिक रोशन : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनने आपल्या कारकीर्दीची सुरूवात ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे केली होती, त्यांनी बाल कलाकार म्हणूनही काम केले होते. इतकेच नाही तर वयाच्या 6 व्या वर्षी त्याने अशा चित्रपटात अभिनय केला, ज्यासाठी त्याला १०० रुपयांचे बक्षीस मिळाले. आपल्या पहिल्या कमाईमधून हृतिकने स्वतःसाठी एक सुंदर खेळण्यातली कार खरेदी केली होती.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.