झटपट नूडल्स चुटकी वाजवताच दोन मिनिटात शिजून तयार होतात. आपण हे नूडल्स कधीही कोठेही शिजवून खाऊ शकता. जितक्या लवकर ते तयार होतील तितके ते अधिक चवदार असतील.
या नूडल्सनी घरापासून दूर राहणाऱ्या लोकांना स्वयंपाक करण्याची आणि पोट भरण्याची समस्या दूर केली आहे. परंतु कोणती हे झटपट नूडल्स खाताना तुम्ही आमच्या प्रश्नाचे झटपट उत्तर देऊ शकाल का, आम्हाला सांगा की झटपट नूडल्स सर्वात प्रथम कोणी आणि कुठे बनवले?
दुसरे महायुद्ध आणि झटपट नूडल्स
ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला होता. जपानमधील हा एक अत्यंत वाईट काळ होता. या हल्ल्यामुळे एक शक्तिशाली औद्योगिक साम्राज्य असणारे जपान रेडिओएक्टिव्ह अवशेषांमध्ये बदलत होता. अशा या कठीण परिस्थितीत कोट्यवधी लोकांचे पोट भरण्याचा प्रश्न जपानच्या सरकारसमोर आ वासुन उभा होता.
या हल्ल्याच्या एका आठवड्यानंतर अमेरिकेला आपली चूक लक्षात आली. त्यांनी जपानला उपासमारीचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पीठ पाठविले. त्यांना वाटले की यापासून ते ब्रेड बनवून आपल्या देशवासीयांची भूक भागवू शकाल. पण जपानमधील लोकांना मोठ्या संख्येने ब्रेड कसा बनवायचा हे माहित नव्हते.
या सगळ्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे जपानी लोक नूडल्स बनवण्यात निष्णात होते. पण तेव्हाच्या नूडल्सच्या बाबतीत सर्वात मोठी कमतरता अशी होती की नूडल्स बनवायला बराच वेळ लागायचा.
एके दिवशी अशाच कडाक्याच्या थंडीत “मोमोफुकू अंडो” नावाच्या व्यक्तीने नूडल्ससाठी लोक रांगेत उभे असल्याचे पाहिले. तेव्हा त्याने विचार केला की एका वाटीभर नूडल्ससाठी लोकांनी इतका वेळ रांगेत उभे राहायची काय गरज आहे ? काहीतरी असे केले पाहिजे ज्यामुळे कमी वेळेत त्यांच्या पोट भरण्याची सोय होईल.
असा लागला झटपट नूडल्सचा शोध
मोमोफुकू अंडो याने नूडल्सवर अनेक प्रयोग केले. शेवटी एके दिवशी त्याला झटपट नूडल्स बनवण्याचा फॉर्म्युला सापडला. हे नूडल्स तयार केल्यानंतर त्यांना वळवले जायचे. नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकून दोन मिनिटात लोकांना खायला दिले जाऊ शकत होते.
या पद्धतीने बनवण्यात आलेले हिकन नूडल्स तर लोकांना इतके आवडले की प्रत्येक घरात चिकन नूडल्स बनवले जाऊ लागले आणि लोकांनी चिकन नूडल्सला आपल्या दैनंदिन जेवणाचा भागच बनवून टाकले. हे नूडल्स जपानबाहेर जगभर प्रसिद्ध झाले. अंडो देखील त्याच्यामुळे एक श्रीमंत व्यक्ती बनला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.