तारीख १० नोव्हेंबर २०१९ ! वेळ दुपारचे ३ वाजून २८ मिनिटे ! ठिकाण आसवलेवाडी येथील आचल मल्टिपर्पज मंगल कार्यालय ! स्पेनमधील लुईस चवारी यांची कन्या नागोरी आणि सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या कोकरुड गावातील शामराव गमे यांचा मुलगा धनराज !
राचिओ, मारिसोल, अल्बर्टो, रुबेन, रिकार्डो, एल्सा, नारिया, बेलेन, इराटी, ज्युलिया, सारा, मारिया आणि मार्कोस हे स्पेन-इंग्लंडचे वऱ्हाडी आणि कोकरुड ग्रामस्थ अशा स्पेन-मराठी भाषिक वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत धनराज आणि नागोरी यांचा विवाहसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला.
स्पेन्सची नागोरी अशी पडली कोकरुडच्या धनराजच्या प्रेमात
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कोकरुड सारख्या डोंगराळ गावात धनराज गमे यांचे शालेय शिक्षण तर इंजिनिअरिंगचे शिक्षण कोल्हापूरमध्ये पार पडले. त्यानंतर धनराज यांना एका कंपनीत जॉब मिळाला आणि कंपनीने २०१५ मध्ये त्यांना इंग्लंडमध्ये पाठवले.
तिथेच स्पेनमधील लुईस चवारी यांची कन्या नागोरी हिलाही जॉब मिळाला. २०१७ मध्ये धनराज आणि नागोरी यांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्या दोघांनी लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
भारतात झाली लग्नाची बोलणी
धनराज आणि नागोरी यांनी एकमेकांविषयी आपल्या घरी माहिती दिली. २०१८ मध्ये नागोरीचे वडील लुईस चवारी आणि आई ज्युलिया चवारी नागोरीला घेऊन भारतात धनराजच्या गावी आले आणि त्याच्या घरी कुटुंबियांना, नातेवाईकांना भेटले. त्यांच्या कौटुंबिक, आर्थिक, शेतीविषयी माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी धनराज आणि नागोरीच्या लग्नाला परवानगी दिली. एवढेच नाही तर धनराजच्या कुटुंबीयांच्या लग्न भारतातच आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे व्हावे या विनंतीला होकारही दिला.
असा पार पडला हा आंतरराष्ट्रीय विवाह
धनराज आणि नागोरीच्या विवाहासाठी ६ नोव्हेंबरलाच स्पेन-इंग्लंडचे वऱ्हाडी मंडळी दाखल झाले. त्या सगळ्यांच्या मुक्कामासाठी एक रिसॉर्ट बुक करण्यात आले होते. आलेल्या पाहुणेमंडळींनी कोकरुड, चांदोली अभयारण्य परिसर पिंजून निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला. फोटोशूट केला.
८ नोव्हेंबरला मेहंदी कार्यक्रम आणि ९ नोव्हेंबरला हळदी समारंभ झाला. १० नोव्हेंबरला आलेल्या सर्व स्पॅनिश पाहुण्यांना भारतीय साडी, कुर्ता हा पोशाख देण्यात आला. भारतीय पद्धतीचा लग्नसोहळा पाहून आलेले सर्व स्पेन-इंग्लंडचे वऱ्हाडी भारावून गेले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.