महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या कार्यालयाला प्रचंड महत्व आले आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी संख्याबळाच्या क्रमवारीनुसार पक्षांना निमंत्रण देतात. पण कुठलाच पक्ष जर सरकार स्थापन करु शकला नाही, तर राज्यपाल राष्ट्रपतींना तसा अहवाल पाठवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधी भूमिका घेऊ शकतात.
अशा अनेक नाट्यमय घडामोडी घडत असताना अजून एका प्रसंगामुळे राज्यपाल कार्यालय चर्चेत आहे. तो प्रसंग म्हणजे गेली ४१ वर्षे सलग राजभवनात जमादार असणारी मराठी व्यक्ती सेवानिवृत्त झाली आहे.
कोण आहे ती व्यक्ती ?
राज्यपाल कार्यालयात जमादार म्हणून सेवा देणाऱ्या मराठी व्यक्तीचे नाव विलास रामचंद्र मोरे असे आहे. मागच्या ४१ वर्षांच्या कालखंडातील प्रामाणिक सेवेनंतर विलास मोरे सेवानिवृत्त झाले आहेत. १९७८ मध्ये मोरे संदेशवाहक म्हणून रुजु झाले होते. मोरेंच्या सेवानिवृत्ती निमित्ताने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांना निरोप देण्यासाठी विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी राजभवनात जल सभागृहात खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सदर प्रसंगी मोरे यांनी “मी साधा राज्यपालांच्या मागे उभा राहणारा शिपाई होतो. राजभवनाच्या ज्या शाही सभागृहात राज्यपाल देशी-विदेशी राष्ट्रप्रमुखांना भेटत असतात, त्या हॉलमध्ये राज्यपालांनी केलेला सन्मान आपण आयुष्यभर विसरणार नाही” अशा शब्दात आपली कृतज्ञता व्यक्त केली.
कोणकोणत्या १४ राज्यपालांचे जमादार होते विलास मोरे ?
वक्तशीर, कार्यतत्पर अशी त्यांची ओळख होती. आपल्या ४१ वर्षांच्या संवेदरम्यान त्यांनी १४ राज्यपालांसोबत काम केले. १) सादिक अली २) एअर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा ३) एअर चीफ मार्शल आय.एच. लतीफ ४) कोना प्रभाकर राव
५) डॉ. शंकर दयाळ शर्मा ६) कासू ब्रह्मानंद रेड्डी ७) डॉ. सी. सुब्रमण्यम ८) डॉ. पी.सी. अलेक्झांडर ९) मोहम्मद फझल १०) एस.एम. कृष्णा ११) एस.सी. जमीर १२) काटीकल शंकरनारायण १३) सी. विद्यासागर राव १४) भगत सिंह कोश्यारी
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.