आजपर्यंत अनेक मराठी अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. बॉलिवूडमध्ये नेहमीच मराठीचा एकप्रकारे दबदबा राहिला आहे. अभिनयातच नाही तर निर्मिती आणि दिग्दर्शनात देखील मराठी माणसांची छाप राहिली आहे. अभिनयात आपले नाव गाजवणारी एक अभिनेत्री म्हणजे अनुजा साठे.
सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असणारी अनुजा आपले फोटो आणि विविध गोष्टी शेअर करत असते. तिचे साडीतील फोटो हे चाहत्यांना खास आवडतात. सोशल मीडियावर तिला चांगले फॅन फॉलोविंग आहे. अनुजा ने मराठीमधील नावाजलेला अभिनेता सौरभ गोखलेशी लग्न केलेलं आहे.
सौरभ गोखलेची पत्नी आहे अनुजा-
“मांडला दोन घडीचा डाव” या मालिकेमध्ये सौरभ आणि अनुजाची ओळख झाली. तिथे भेटल्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर सौरभ ला माहिती कळली कि अनुजा हि त्याच्या वर्गमित्राची छोटी बहीण आहे. एवढेच नाही तर सौरभ चा मावस भाऊ सुद्धा अनुजाचा मित्रच निघाला.
मराठी मालिकेद्वारे अभिनयास सुरुवात करत-
अनुजा साठेने हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे. तिने मराठी मालिकेद्वारे आपल्या अभिनयास सुरुवात केली. अग्निहोत्र, मांडला दोन घडीचा डाव या मालिकांसह कॉफी आणि बरेच काही, राखणदार या मराठी चित्रपटातदेखील भूमिका साकारल्या आहेत.
‘बाजीराव मस्तानी’मधून बॉलिवूडमध्ये एंट्री-
संजय लीला भन्साली यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमातून अनुजानं बॉलिवूडमध्ये एंट्री मारली. यानंतर तिने ब्लॅकमेल या सिनेमात देखील अभिनय केला. अनुजाने पेशवा बाजीराव या प्रसिद्ध हिंदी मालिकेत देखील पेशवा बाजीरावची आई राधाबाईची भूमिका साकारली.
अनुजा साठेने परमाणू या बॉलिवूडच्या सिनेमात दमदार अभिनय करून चाहत्यांची मनं जिंकली. जॉन अब्राहम ची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात अनुजाने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाची झलक तिने यातून दाखवून दिली होती.
शाश्त्रज्ञाच्या भूमिकेत अनुजा परमाणू सिनेमात दिसली होती. अनुजा साठेने या सिनेमात सुषमा रैना नावाची भूमिका साकारली होती. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.