सलमान खानच्या रियालिटी शो बिग बॉसचा १३ वा सिझन सध्या सुरु आहे. हा शो चांगलाच लोकप्रिय झाला असून या शोमधून अनेक चेहरे बॉलीवूडला मिळाले आहेत. या शोमध्ये प्रत्येक आठवड्याच्या शेवटी सलमान खान स्वतः दिसून येतो. पण इतर दिवशी बिग बॉसच्या घरात एक रुबाबदार आवाज स्पर्धकांना “बिग बॉस चाहते है की किंवा सुबह के दस बीज चुके है…” असा आदेश देताना ऐकायला येतो.
पण तुमच्या माहितीसाठी हा आदेश देणारी व्यक्ती एकच नसुन दोघेजण आहेत. त्या दोन व्यक्ती कधीच समोर आल्या नाहीत. आज आम्ही तुम्हाला त्या व्यक्तींची माहिती सांगणार आहोत…
१) अतुल कपुर :
बिग बॉसच्या स्पर्धकांप्रमाणेच तीन महिने घरात राहून त्यांच्यावर निगराणी ठेवणारी पहिली व्यक्ती अतुल कपूर आहेत. या घरात अतुलसाठी एका स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली असून तिथून ते सर्व स्पर्धकांवर निगराणी ठेवतात.
बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांना सूचना देण्यापासून त्यांना झापण्यापर्यंत त्यांचाच आवाज ऐकू येतो. बिग बॉसच्या पहिल्या सीझनपासून अतुल कपूर या शोसोबत जोडले गेले आहेत. अतुलने आपल्या करिअरची सुरुवात व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि ऍक्टर म्हणून केली होती.
२) विक्रम सिंह :
बिग बॉसच्या घरात येणारा दुसरा आवाज विक्रम सिंह यांचा आहे. मागच्या ९ वर्षांपासून विक्रम निवेदक म्हणून बिग बॉसमध्ये कार्यरत आहेत. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून करिअर सुरु करणाऱ्या विक्रम सिंहांनी जवळपास २५० रियालिटी शो आणि १०० टीव्ही कमर्शियल्समध्ये आपला आवाज दिला आहे.
बिग बॉसमध्ये वेळ सांगण्यापासून रिकॅपमध्ये घडलेल्या गोष्टींची माहिती देण्याचे ते काम करतात. अतुल कपूर आणि विक्रम सिंह हे बिग बॉसच्या लोणावळ्यातील सेटपासून जवळच राहायला आहेत. रात्री लाईट ऑफ झाल्यानंतर ते जातात आणि सकाळी स्पर्धकांना जाग यायच्या आधी सेटवर हजर असतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.