बिग बॉस ११ चांगल्या जोरावर आहे यामध्ये नुकतीच वाइल्ड कार्ड एन्ट्री झालेली आहे. या वाइल्ड कार्ड एन्ट्री मध्ये काही विशेष चेहरे आहे ज्यापैकी एक तेहसीन पूनावाला हे एक आहे. राहुल गांधी आणि वडेरा परिवारासोबत तेह्सीन पूनावाला यांचे जवळचे संबंध अनेकांना माहिती नाही आहे.
मागे जैन मुनिवर आक्षेपार्ह टिपणी केल्यामुळे तहसीन पूनावाला चांगलेच वादात सापडले होते. तेहसीन पूनावाला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याविरोधात काँग्रेस नेता शहजाद पुनावाला यांनी आवाज उठवल्यानंतर स्वतःच्या भावासोबत तहसीन यांनी नाते तोडले असे tweet केले होते.
आता बघूया तहसीन आणि राहुल गांधी यांचे संबंध कसे आहे. तर २०१६ साली तहसीन यांचे लग्न हे मोनिका वाड्रा यांच्या सोबत झाले. आणि मोनिका वडेरा हि प्रियंका गांधी यांचे पती रोबर्ट वडेरा यांची चुलत बहिण आहे. त्यामुळे तहसीन आणि वडेरा हे राहुल गांधी यांच्या जावयांच्या जावाई आहे.
तहसीनचा भाऊ हा राजकारणात सक्रीय आहे. तहसीन राजकीय विश्लेषक, लेखक, एक टीवी होस्ट आणि उद्योजक देखील आहे. तहसीन यांची पत्नी मोनिका हि एका ज्वैलरी ब्रांडची मालकीण आहे. खेसारी लाल यादव, तहसीन यादव, शेफाली झारीवाला आणि विकास उर्फ हिंदुस्तानी भाऊ यांनी वाइल्ड कार्ड म्हणून घरात एन्ट्री केलेली आहे.
तहसीन पूनावाला हे भारतातील सर्वात कमी वयाचे राजकीय विश्लेषक आहे. अनेकदा ते आपणास डिबेट शो मध्ये देखील दिसतात. त्यांचे मते बिग बॉस मधील स्पर्धकांना एक चांगला नेता हवा त्यासाठी ते बिग बॉस मध्ये आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.