देशात पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आहे. अनेक राजकीय नेते, धर्मरक्षक, अनेक संघटना सर्वजण या विषयवार राजकारण करण्यात व्यस्त आहेत. काहीजण म्हणतात की अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिर बांधले जावे, तर कोणी त्यास विरोध करत आहे.
लवकरच सर्वोच्च न्यायालय या वादाशी संबंधित खटल्याचा निकाल देणार आहे. ज्या ज्या वेळेस अयोध्या राममंदिर वादाचा विषय येतो त्या त्या वेळेस कारसेवक किंवा कारसेवा हा शब्द आपल्या वाचण्यात किंवा ऐकण्यात आला असेल. परंतु आपल्याला या शब्दाचा अर्थ माहित आहे काय ? चला तर आज यानिमित्ताने जाणून घेऊया कारसेवक किंवा कारसेवा म्हणजे काय…
कारसेवक म्हणजे काय?
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर ‘कारसेवक’ हा शब्द चर्चेत आला आहे. लाखो कारसेवकांनी राममंदिर निर्माण आंदोलनात सहभाग घेतल्याचे म्हटले जाते. कारसेवक या शब्दातील कारचा आपण समजतो त्या कार वाहनाशी अजिबात संबंध नाही.
मुळात कारसेवक हा संस्कृत शब्द आहे. यामध्ये ‘कार’ म्हणजे कर आणि ‘सेवक’ म्हणजे सेवा देणारा. जास्तकरुन धार्मिक गोष्टींमध्ये लोक अशी निस्वार्थ सेवा देत असतात. कारसेवकला इंग्रजीत व्हॉलिंटियर असा शब्द वापरला जातो. थोडक्यात जी व्यक्ती निस्वार्थ भावनेने सेवा देते आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी पाऊले उचलते त्यांना कारसेवक म्हणतात.
जालियनवाला बाग हत्याकांडाच्या दरम्यान चर्चेत आला होता कारसेवक हा शब्द
शीख धर्मग्रंथांमध्येही कारसेवा या शब्दाचा उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो. गुरुद्वारामधील लोक निस्वार्थ भावनेने धार्मिक सेवा करतात. असे म्हटले जाते की कारसेवा ही शीख धर्माचीच शिकवण आहे. जालियांवाला बाग हत्याकांडाच्या काळात क्रांतिकारक उधमसिंग यांनी कारसेवा केली होती. १९८३ मध्ये अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिराची निर्मिती देखील कारसेवेच्या माध्यमातूनच झाल्याचे सांगितले जाते. कारसेवा या शब्दाचे स्पेलिंग C या शब्दाने नाही, तर K या शब्दाने सुरु होते.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.