केंद्र सरकारने ३ वर्षांपूर्वी कालच्या दिवशी नोटबंदीचा मोठा निर्णय घेतला होता. काळ्या पैश्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोदींनी अचानक रात्री आठ वाजता देशवासियांना संबोधित करत पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा केली होती.
मोदींनी जाहीर केलेला हा निर्णय सर्वानाच धक्का देणारा ठरला होता. या निर्णयानंतर देशात आजही हा निर्णय फसला का योग्य होता यावरून मतमातांतरे आहेत. नोटबंदीनंतर देशातील नागरिकांना झालेला त्रास हा आजही अनेकजण बोलून दाखवतात.
देशभरात या नोटबंदीच्या निर्णयावर आजही मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते. काल ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर विरोधकांकडून एक हॅशटॅग वापरून या निर्णयाचा विरोध दर्शवण्यात आला. #DeMonetisationDisaster हा हॅशटॅग वापरुन या निर्णयावर टीका केली जात आहे.
दरम्यान यामध्ये हरियाणा युवक काँग्रेसचे नेते दीपक त्यागी यांनी केलेलं एक ट्विट चांगलंच चर्चेचा विषय बनलं आहे. दीपक त्यागी यांनी नोटांच्या रंगांवरुन मोदी सरकारला टोला लगावला आहे. दीपक त्यागी यांनी एक फोटो ट्विट केला आहे ज्यामध्ये नोटबंदीनंतर देशात ज्या नवीन विविध रंगाच्या नोटा आल्या त्या दिसत आहेत.
सगळ्या रंगाच्या नोटा पहिल्या पण आता त्या रंगाच्या नोटा कधी येणार?
त्यागी यांनी ट्विट केलेल्या फोटोत १०, ५०, १००, २०० ५०० आणि दोन हजारच्या नोटा दोरीला लटकवण्यात आलेल्या आहेत. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि “गुलाबी, हिरवी, नारंगी, जांभळी, तपकीरी अशा सर्वच रंगाच्या नोटा आहेत पण काळा पैसा कुठे आहे?,”
“Pink, green, orange, purple, brown all colours money are there but where is that Black money “#DeMonetisationDisaster #Demonetisation#BlackDay pic.twitter.com/Hj6JP6frgG
— Deepak Tyagi (@iDeepakTyagi) November 8, 2019
मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर करताना काळा पैसा भारतात परत येईल असे म्हंटले होते. हाच मुद्दा पकडून त्यागी यांनी सर्व रंगाच्या नोटा आल्या आता काळ्या रंगाच्या नोटा कधी येणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.