नाना पाटेकर यांनी मराठी आणि बॉलिवूडमध्ये त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या अभिनयावर आज त्यांचे फॅन्स फिदा आहेत. बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. आज त्यांनी क्रांतीवीर, वेलकम, परिंदा, अग्निसाक्षी, राजू बन बया जंटलमॅन, तिरंगा, अपहरण यांसारख्या अनेक हिंदी तर नटसम्राट, सिंहासन, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटेः द रिअल हिरो यांसारख्या मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा मराठमोळा अभिनेता नाना पाटेकर म्हणून तुम्ही नानांना ओळखत असालच. पण, नानांच्या मुलाला तुम्ही क्वचितच पाहिलेलं असेल. ‘स्टार कीड’ असूनही नानांचा मुलगा मात्र कधीच स्टार अॅटिट्युड दाखवताना दिसला नाही. किंबहुना तो लाईम लाईटपासून दूर राहणंच पसंत करतो. मल्हार पाटेकर असं त्याचं नाव आणि महत्त्वाचं म्हणजे, मल्हारचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे त्याचे वडील नाना पाटेकर
चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर नाना आर्मीमध्ये कार्यरत होते. हे. नाना यांचा जन्म मुरूड जंजिरातील एका सामान्य कुटुंबातील आहे. नानांच्या व्यवसायिक आयुष्यासोबत नेहमीच नानांचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहिले आहे. नाना यांचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. नाना यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत झाले होते.
नाना आणि नीलकांती यांनी प्रेमविवाह केला होता. त्यावेळी नाना २७ वर्षांचे होते. लग्न झाले त्यावेळी नीलकांती नानांपेक्षा अधिक कमवत होत्या. त्यावेळी त्या बँकेत नोकरीला असून त्यांचा पगार अडीज हजार रुपये होता तर नाना केवळ साडे सातशे रुपये कमवत असत. पण नाना यांना अभिनयाची असलेली आवड नीलकांती यांनी ओळखली होती. नानांच्या करियरमध्ये त्या नेहमीच त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या.
नीलकांती आणि नाना यांना मल्हार हा मुलगा असून त्याला अनेकवेळा नानांसोबत पाहायला मिळते. आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवत मल्हारलाही अत्यंत साध्या पद्धतीनं आयुष्य जगायला आवडतं. मात्र, वडिलांप्रमाणे कॅमेरा – लाईटस हा मल्हारच्या आयुष्याचा भाग नाही. इतकंच नाही तर मल्हार सोशल मीडियावरही फारसा अॅक्टीव्ह नाही. त्यामुळेच, मोजक्याच लोकांना मल्हारबद्दल माहिती आहे.
पण तुम्हाला माहीत आहे का, मल्हारच्या आधी देखील नानांना आणि नीलकांती यांना एक मुलगा होता. पण जन्मानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला. नाना आणि नीलकांती गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहात आहेत.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.