चलन म्हणजे देवाणघेवाण किंवा विनिमयाचे कायदेशीर माध्यम ! प्रत्येक देशामध्ये चलनाचे मूल्य आणि नाव वेगवेगळे असते. भारतामध्ये रुपया हे चलन असुन ते नोटा आणि नाणी या स्वरुपात अस्तित्वात आहे. प्रत्येक देश आपल्या देशातील एखाद्या महान व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी चलनावर त्यांची प्रतिमा छापतो.
भारतात महात्मा गांधींच्या मृत्यूच्या ८८ वर्षांनंतरही त्यांची प्रतिमा नोटांवर छापण्यात येते. परंतु काही देशांमध्ये एखादी महान व्यक्ती जिवंत असेपर्यंतच त्याची प्रतिमा चलनावर छापली जाते, त्याच्या मृत्यूनंतर त्याची प्रतिमा चलनावरुन हटवली जाते.
३५ देशांच्या चलनावर आहे या व्यक्तीची प्रतिमा
जॉर्ज पंचमच्या मृत्यूनंतर ६ फेब्रुवारी १९५२ पासुन राणी एलिझाबेथ द्वितीय ब्रिटनची महाराणी म्हणुन पदावर कार्यरत आहे. आज राणीचे वय ९२ आहे. ब्रिटनच्या चलनावर या राणीची प्रतिमा छापण्यात आली आहे. केवळ ब्रिटनचा नाही; तर
कॅनडा, बहामास, बेलिझ, बर्म्युडा, ब्रिटीश व्हर्जिन बेटे, केमन आयलँड्स, डोमिनिका, पूर्व कॅरिबियन राज्ये, जमैका, टर्क्स कैकोस, फाल्कलँड बेटे, सेंट हेलेना, ट्रिस्टन दा कुन्हा, दक्षिण आफ्रिका, र्होडेशिया, पूर्व आफ्रिका, नायजेरिया, मॉरिशस, सेशल्स, हाँगकाँग, मलाया ब्रिटिश बोर्निओ, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, टोकलाऊ, फिजी, किरीबाती, पापुआ न्यू गिनी, सोलोमन आयलँड्स, तुवालू, सायप्रस, जिब्राल्टर, गुरन्से, जर्सी, आइल ऑफ मॅन अशा ३५ देशांच्या चलनावर राणी एलिझाबेथ द्वितीयची प्रतिमा आहे.
राणीच्या मृत्यूनंतर बदलेल या देशांचे चलन
ब्रिटनमध्ये असा नियम आहे की ब्रिटनच्या राजा किंवा राणी या पदावर जिवंत असणाऱ्या व्यक्तीच्या फोटोसह त्यांच्या देशाचे चलन छापले जाईल. म्हणजेच राणी एलिझाबेथ द्वितीयच्या मृत्यूनंतर प्रिन्स एलिझाबेथ राजा होईल. यासोबतच राणी एलिझाबेथचा फोटो असणाऱ्या जुन्या नोटा चलनातून बाद होतील आणि ब्रिटनच्या नव्या चलनावर प्रिन्स एलिझाबेथ राजाचा फोटो छापला जाईल.
कधीकाळी ब्रिटनने ज्या देशांवर राज्य केले किंवा जे देश ब्रिटिश कॉमनवेल्थचे सदस्य आहेत, त्या देशांच्या चलनावर राणी एलिझाबेथ द्वितियच फोटो आहे. ते देश ब्रिटिश धोरण पालन करत असल्यामुळे कदाचित त्या देशांनाही यामुळे आपल्या चलनात बदल करावा लागू शकतो.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.