मुकेश आणि नीता अंबानी यांच्या मुलीचे म्हणजेच ईशा अंबानीचे लग्न मागे झाले. ईशा ही आता पिरामल घराण्याची सून आहे. पिरामल एंटरप्रायझेसचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्यासोबत त्या विवाहबध्द झाली. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळात सामील ईशा अंबानी बिझनेसमधील स्टायलिश आयकॉन म्हणून ओळखल्या जातात.
मुकेश अंबानी हे देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर ईशा देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची मुलगी आहे. त्यांचे नाव फोर्ब्सच्या यादीत बिलेनिअर उत्तराधिकारी म्हणून सामील करण्यात आलेले आहे. परंतु अंबानी परिवार सोशल मीडियापासून बराच दूर राहतो.
सोशल मिडीयावर ईशाचे अनेक स्टायलिश फोटो वायरल होतात. परंतु तिचे खरे अकाउंट कोणते आहे हे अनेकांना माहिती नाही. कारण तिने सुध्दा हे अकाउंट सिक्रेट ठेवले आहे. काही ठराविक लोकांना तिने आपले फोटो बघायची परमिशन दिली आहे.
तिचे खरे अकाउंट तिने वेरीफाय देखील केलेले नाही आहे. अंबानी fan क्लब वरून अकाउंट आहे आणि या खात्याचा युजरनेम ‘_iiishmagish’ असा आहे. हे खाते जास्त सक्रीय नाही परंतु मोठ मोठे सेलिब्रिटी अभिनेता अभिनेत्री तिला फॉलो करतात.
इशा अंबानीच्या या खात्याला फॉलो फक्त ६३६ लोक करतात. आणि ती स्वतः ५९९ लोकांना फॉलो करते. आत्ता पर्यंत तिने तब्बल ३०० पोस्ट या खात्यावरून केल्या आहे. तिचे फोटो प्रत्येकाला बघता येत नाही कारण तिने फॉलो करायचे अधिकार स्वतः कडे ठेवलेले आहे.
मोठे सेलिब्रिटी करतात फॉलो
तिला फॉलो करणारे लोक साधे सुधे नाही यावरून हे खाते खरे आहे याची खात्री होते. प्रियंका चोपड़ा, आलिया भट्ट, कियारा आडवाणी, मनीष मल्होत्रा आणि शाहिद कपूर यांची पत्नी मीरा राजपूत कपूर तिला फॉलो करते. आणि स्वतः इशा देखील त्यांना फॉलो करते.
काही सामान्य व्यक्ती देखील हे अकाउंट फॉलो करतात. कदाचित ते तिचे शाळेतील मित्र आणि मैत्रीण असावे. हे आहे ईशाचे गुपित instagram account जे आम्ही तुमच्या साठी शोधून आणले आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर देऊ शकता.