आपल्या अचुक कॉमिक टायमिंगने लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले होते, तर काही काही चित्रपटांमधून प्रेक्षकांना रडवलेदेखील. मराठीतच नव्हे तर हिंदीतही आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे लक्ष्मीकांत आज आपल्यात नाहीत. परंतु त्याच्या अजरामर कलाकृती त्याला आजही आपल्या समोर जिवंत ठेवून आहे.
लक्ष्मीकांत बर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोंबर १९५४ रोजी मुंबई येथे झाला. लक्ष्या हा अभिनेता नसून जादुगार होता त्याचा अभिनय प्रेक्षकांना भुरळ घालत असे. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, गिरगावातील सार्वजनिक गणेशोत्सवातून हा कलाकार चमकला.
जीवणातील अभिनयाची सुरवात १९८३-८४ या काळात केली.पुरुषोत्तोम बेर्डे यांच्या ‘टूर टूर’ ह्या नाटकामध्ये प्रमुख भूमिका सादर करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘लेक चालली सासरला’ हा त्यांच्या जीवनातील प्रथम चित्रपट होता.प्रथम चित्रपटामध्येच त्यांना प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत घेण्यात आले होते. त्यानंतर आलेले धूमधडाका, थरथराट, अशी हि बनवाबनवी हे चित्रपट गाजत गेले.
अभिनय आणि स्वानंदी हे लक्ष्याची दोन मुले. अभिनय नुकताच ती सध्या काय करते मधून अभिनयास सुरवात केलि आहे आणि स्वानंदी अजूनही शिक्षण पूर्ण करत आहे. एक होता विदुषक या चित्रपटाच्या अपयशामुळे लक्ष्मीकांत बर्डे खचून गेले व या अपयशातून ते स्वतःला सावरू शकले नाही असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
लक्ष्मीकांत बेर्डे हे केवळ एक अभिनेता नसून ती एक जादू होती. 26 ऑक्टोबर 1954 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे पहिले लग्न रुही बेर्डेसोबत झाले होते. पण काहीच वर्षे दोघांचा संसार टिकला. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अभिनेत्री प्रिया अरुणला डेट केले.
ते दोघेही लिव्हइनमध्ये राहू लागले. दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दल कोणाला सांगितले नाही. सोबत राहत असतानाचा त्यांना अभिनय आणि स्वानंदी बेर्डे हे दोन मुले झाले. लक्ष्मीकांत यांनी ‘अभिनय आर्ट्स’ नावाने त्यांचे प्रोडक्शन हाऊस सुरु केले. काही जणांच्या मते प्रिया सोबत असलेल्या प्रेमामुळे ते दोघे वेगळे झाले असे सांगितल्या जाते.
एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत आणि रुही यांच्याविषयी सांगितले होते, की “लक्ष्मीकांत यांच्या यशात सर्वोत मोठा वाटा हा रुही बेर्डेंचा होता. जेव्हा लक्ष्मीकांत प्रसिद्ध नव्हेत, त्याकाळात रुही यांनी त्यांना साथ दिली होती.
विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणा-या या अभिनेत्याने 16 डिसेंबर 2004 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. मूत्रपिंडाचा विकाराने वयाच्या 50व्या वर्षी लक्ष्मीकांत बेर्डेंचे निधन झाले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.