बॉलिवूड अभिनेत्री तब्बू ४८ वर्षांची झाली आहे, मात्र अद्याप तिने लग्न केलेले नाही. ४ नोव्हेंबर १९७१ रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या तब्बूचे खरे नाव तबस्सुम फातिमा हाश्मी असे आहे. ८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाज तिची थोरली बहीण आहे. अभिनेत्री शबाना आझमी आणि बाबा आझमी यांची ती भाची आहे. फिल्मी बॅकग्राऊंड असल्याने तब्बूची बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती.
तब्बूने हिंदीसह तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृ्ष्टीमध्ये देखील काम केले आहे. आता पर्यंत दोन वेळा तब्बूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तब्बूने वयाच्या १४ व्या वर्षी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. तिचा ‘हम नौजवान’ हा पहिलावहिला चित्रपट आहे. या चित्रपटात देवानंद मुख्य भूमिकेत होते आणि त्यांच्या मुलीची भूमिका तब्बूने वटवली होती.
“माचिस”, “विरासत”, “हू तू तू”, “अस्तित्व”, “चांदनी बार”, “मकबूल”, “चीनी कम” “द नेमसेक”, “हैदर” आणि “दृश्यम”सारख्या दमदार सिनेमांत काम करणारी तब्बू बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे, जिच्या नावे रेकॉर्ड अवॉर्ड्स आहेत. तिने फिल्मफेअरमध्ये आतापर्यंत चार उत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) पुरस्कार मिळवले आहेत. शिवाय तिने पदार्पणातील उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर आणि उत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीचे 2 राष्ट्रीय पुरस्कार नावी केले आहेत.
साऊथचा जेष्ठ अभिनेता नागार्जुनसोबत तब्बूचं नाव जोडलं जात होतं. नागार्जुनमुळे तब्बूने लग्न न केल्याची चर्चा होती. सिनेमा मॅग्झिनने छापलेल्या वृत्तानुसार तब्बू नागार्जुनच्या अखंड प्रेमात होती. त्याच्यासाठी मुंबईसोडून तब्बू हैदराबादमध्ये शिफ्ट झाली. नागार्जुन आणि तब्बू जवळपास 15 वर्ष एकमेकांना डेट करत होते. इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या काहीतरी बिनसलं आणि नागार्जुन आणि तब्बूच्या नात्यात दुरावा आला.
दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाला डेट केलेल्या तब्बूचे नाव दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनसोबत जुळले होते. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 8’चा स्पर्धक उपेन पटेलसोबत तब्बूचे अफेअर असल्याची चर्चा समोर आली होती. उपेन तब्बूपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. तब्बू आणि जॅकी श्रॉफ यांनी आजवर एकाही सिनेमात एकत्र काम केलेले नाही. यामागचे कारण म्हणजे काही वर्षांपू्र्वी तब्बूने जॅकी यांच्यावर छेडछाडीचा आरोप लावला होता. बातम्यांनुसार, तब्बूची थोरली बहीण आणि अभिनेत्री फराह नाजने एका मुलाखतीत जॅकीने तब्बूची छेड काढल्याचा खुलासा केला होता.
मात्र वयाच्या ४८ वर्षांनंतरही तब्बू अविवाहित आहे. यासाठी तब्बू बॉलीवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगणला जबाबदार मानते. एका मुलाखतीमध्ये तिने याबाबत खुलासा केला होता. तब्बू म्हणाली, मी आणि अजय 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. अजय माझा कझिन समीर आर्यचा शेजारी आणि जवळचा मित्रही होता. मी जेव्हा छोटी होते, त्यावेळी समीर आणि अजय माझ्यावर लक्ष ठेवून असायचे. मला एखाद्या मुलाशी बोलताना पाहिले की, ते त्या मुलाची धुलाई करायचे. दोघे त्यावेळी फार गुंडगिरी करायचे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.