मागे थायलंडमध्ये एक विचित्र विवाह पार पडला. आपल्या प्रियकराचा अचानक हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्यावर त्याच्या प्रेयसीने त्याच्या मृतदेहाशी विवाह केला होता असाच काही प्रकार आता भारतात देखील बघायला मिळत आहे. यूपीच्या अलिगडमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे एका विधवा महिलेने तिच्या प्रियकराच्या फोटोशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे या प्रियकराचा मृत्यू होऊन दोन वर्ष झाले आहे. परंतु जीवापाड प्रेम केल्याने तिचे मन आपल्या प्रियकरा शिवाय लागत नव्हते. त्यामुळे तिने फोटो सोबत लग्न करायचा आता निर्णय घेतला आहे. या अनोख्या लग्नाला मंदिर समिती आणि महिलांच्या कुटुंबीयांचा विरोध आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, मंदिर समितीचे लोक या लग्नाला विरोध करीत आहेत.
हे लग्न थांबवण्यासाठी या समितीने याबाबत एसडीएम पोलीस ठाण्याला पत्र लिहून मदतीसाठी विनंती केली आहे. महिलेने सांगितले आहे की, 8 नोव्हेंबर रोजी ती आपल्या प्रियकराच्या फोटोसह बडा महादेव मंदिरात सात फेरे घेणार आहे.
या अगोदर झाले होते लग्न
३७ वर्षीय कविता शर्मा याचे पहिले पती स्व. दीपक वर्मा,ब्रह्मनपुरी हे आहेत. त्यांचा मृत्यू बिमारी मुळे झाला होता आणि तिचा प्रियकर सौरभ वर्मा याचा मृत्यू १६ सप्टेंबर २०१७ ला झाला आहे. कविता वर्मा च्या म्हणण्या नुसार त्यांनी दोघांनी आयुष्यभर सोबत राहायची शपथ घेतली होती त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे तिच्या लग्नाचा नवरा वेगळा आहे त्याचे निधन ३ वर्षापूर्वी झाले आहे व तिला चार अपत्य देखील आहे. परत तिला प्रियकर मिळाला परंतु त्याचा देखील मृत्यू २ वर्षाखाली झाला आहे. तिने लग्नाची देखील तयारी पूर्ण केली आहे.
हिलेने काही नातेवाईक आणि जवळच्या लोकांना आपल्या लग्नाची आमंत्रण पत्रिका पाठवली आहे. विवाहादरम्यान सुरक्षेसाठी महिलेने पोलिसांकडून मदत मागितली आहे. याप्रकरणी पोलिसांनीही महिलेला सुरक्षा पुरवणार असल्याचे सांगितले आहे.
या पत्रिकेत ८ तर्खीला दुपारी जेवणाचा कार्यक्रम आणि सायंकाळी वरातीचे स्वागत आणि सात फेरे घेऊन लग्न करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी विदाईचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण निज निवास बड़ा महादेव मंदिर हे आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.