मायकेल जॅक्सन भारतात आला असताना एक सुंदर असा छोटासा प्रसंग घडून गेला होता, त्याबद्दल वाचल्यानंतर मनाला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. ते वर्ष होते १९९६. विजक्राफ्ट इंटरनॅशनल नावाच्या कंपनीचे लोक लॉस एंजेलिसमध्ये मायकेल जॅक्सनला भेटायला गेले.
मायकेलने त्यांना भारतात येऊन मुंबईत परफॉर्म करण्याचे वचन दिले. मायकेल जॅक्सनच्या सादरीकरणासाठी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बुक करण्यात आले आणि संपूर्ण भारतभर बातमी पसरली. ३० ऑक्टोबर १९९६ रोजी मायकेलचे खासगी विमान उतरणार होते. आपल्या आवडत्या पॉप गायकाची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोक जमले.
मायकेल त्याच्या ट्रेडमार्क लाल नेपोलियन जॅकेटमध्ये आला. प्रचंड गर्दी झाली. मायकलला सहार विमानतळावरून ओबेरॉय हॉटेलमध्ये नेण्यासाठी अनिल अंबानी यांनी टोयोटा कारची व्यवस्था केली होती. गाडीसुद्धा अशी की त्याकाळातही अंबानींच्या त्या कारला सनरूफ होता. ओबेरॉय हॉटेलचा कोहिनूर सूट किंग ऑफ पॉपची वाट पाहत होता.
मध्येच धारावी लागली, मायकल खाली उतरुन लोकांना भेटला. एवढेच नव्हे तर विमानतळ ते नरिमन पॉईंट या संपूर्ण मार्गावर गाडीच्या सनरुफच्या बाहेर येऊन त्याने गर्दीला हातवारे केले. मायकेलला भेटायला प्रत्येकजण उत्सुक होता. प्रभू देवा त्याला भेटण्यासाठी दिवसभर लॉबीमध्ये थांबला होता.
जेव्हा सर्व काही व्यवस्थित झाले तेव्हा भारतातून जाताना मायकेलने ओबेरॉयने हॉटेलच्या खोलीतील उशीवर चाहत्यांसाठी एक संदेश सोडला होता. त्यात लिहले होते : भारता, मी आयुष्यभर तुझा चेहरा पाहण्यासाठी वाट बघितली आहे. मी तुला आणि तुझ्या लोकांना भेटलो आणि मी त्यांच्या प्रेमात पडलो. आता माझे हृदय दु:खाने आणि उदासीपणाने भरले आहे, कारण मला जायचे आहे.
पण मी वचन देतो की मी परत येईल. तुझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि तुला आपल्या कवेत घेण्यासाठी. तुझ्या दयाळूपणाने माझे हृदय वितळले आहे. तुझ्या आध्यात्मिक जाणिवेने मला प्रभावित केले आहे आणि तुझ्या मुलांनी माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे. त्यांच्या चेहऱ्यामध्ये मला देव दिसत आहे. भारता, मी तुझ्यावर खरोखर प्रेम करतो. मुलांना प्रेम देत रहा, त्यांना सतत शिक्षण देत रहा, भविष्यातील चमक फक्त त्यांच्याकडूनच आहे. भारता, तू माझे खास प्रेम आहेस. देव तुम्हाला सदैव सुखी ठेवो.”
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.