गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे संजय राऊत सातत्याने माध्यमांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. आता तर रोज सकाळी संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन काय बोलतील याचीच उत्सुकता असते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या पदरात पडण्याबद्दलची भूमिका मांडण्यासाठी शिवसेनेकडून एकमेव संजय राऊत माध्यमांच्या समोर जात आहेत. शाब्दिक वार-पलटवाराच्या या युद्धात संजय राऊतांनी भाजप नेत्यांची अक्षरशः पिसे काढली आहेत.
कोण आहेत संजय राऊत ?
संजय राऊत हे शिवसेनेचे ज्येष्ठ राजकीय नेते असून इंडियन एक्सप्रेसच्या पुरवठा विभागात नोकरी, लोकप्रभा साप्ताहिकात क्राईम रिपोर्टर ते शिवसेनेच्या सामना या मुखपत्राचे १९९३ पासून कार्यकारी संपादक असा त्यांचा पत्रकारिता क्षेत्रातील प्रवास आहे. २००४, २०१० आणि २०१६ असे तीन वेळा शिवसेनेचे राज्यसभा खासदार म्हणून देखील त्यांची निवड झाली आहे.
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या शिवसेनेच्या संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचा बायोपिक “ठाकरे” या चरित्रपटाचे देखील ते लेखक आहेत. शिवसेनेचे दिल्लीतील वरच्या फळीतील नेते म्हणून संजय राऊतांकडे पाहिले जाते.
राज ठाकरे शिवसेना सोडताना संजय राऊतांनी लिहले होते त्यांचे राजीनामापत्र
२००५ मध्ये शिवसेनेतील बाळासाहेबांच्या वारसदारावरुन उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात उफाळलेल्या वादात बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना आपला वारसदार नेमले. त्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांनी आपल्या शिवसेना राजीनाम्याचे पत्र बाळासाहेबांकडे पाठवले.
बाळासाहेबांनी पत्र वाचताच पत्रातील लिखाणाची शैली त्यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरित संजय राऊतांकडे कटाक्ष टाकून म्हटले, “संजय, हे तुझंच काम दिसतंय !” त्यांनतर मनोहर जोशी आणि संजय राऊत हे दोघेजण राज ठाकरेंची समजूत घालण्यासाठी त्यांच्याकडे गेले, त्यावेळी राज ठाकरेंच्या समर्थकांनी त्यांची गाडी अक्षरशः फोडून टाकली होती.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.