विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसाने खूप प्रगती केली आहे. आगामी काळात रोबोटिक्स तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले जाणार आहे. लंडनमधील टेक जिओमिक नावाची कंपनी एक असाच रोबोट बनवित आहे जो अगदी माणसासारखाच दिसेल.
कंपनीच्या म्हणण्यानुसार या रोबोटचे नाव व्हर्च्युअल फ्रेंड ठेवण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी या रोबोटच्या निर्मितीचे काम सुरु होईल. कंपनी सध्या या रोबोटसाठी एक मानवी चेहरा शोधत आहे, त्याबदल्यात कंपनी मानवाला ९२ लाख रुपये देण्यास तयार आहे.
कंपनीने रोबोटला दिल्या जाणाऱ्या चेहऱ्यासाठी एक अट ठेवली आहे. रोबोटसाठीचा चेहरा दिसायला दयाळू आणि मैत्रीपूर्ण असला पाहिजे. कंपनीने म्हटले आहे की यासाठी ती त्या व्यक्तीच्या चेहऱ्यासाठी करार करेल आणि करारानुसार त्याला त्याची रक्कम दिली जाईल.
वास्तविक कंपनीला आपला रोबोटला असा चेहरा द्यायचा आहे, जो दिसायला हुबेहूब माणसासारखा असेल. पुढील वर्षात या रोबोटची निर्मिती केली जाणार असल्याने त्यासाठीच्या चेहऱ्याचा शोध आतापासूनच सुरु करण्यात आला आहे. कंपनीने यासाठी अनेक चेहऱ्यांची चाचणीही केली आहे. कंपनीने सांगितले की आतापर्यंत कंपनीने जे चेहरे निवडले आहेत, त्यांना वैयक्तिकरित्या कंपनीने पैसे दिले आहेत.
तशी ही एक वेगळ्याच प्रकारची मागणी आहे. कंपनी असे काही चेहरे शोधत आहे जी इतरांपेक्षा वेगळे दिसतात. कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यासाठी परवाना करार करणे हा एक मोठा निर्णय आहे. चेहऱ्यासाठी करार केल्यानंतरच त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा रोबोट तयार केला जातो.
हे कुठल्या सामान्य रोबोटसारखे दिसणार नाहीत, तर त्याची स्वतःची एक वेगळी ओळख असेल आणि तो हुबेहूब माणसासारखा दिसेल. रोबोटिक्स कंपनी जिओमिक गेल्या पाच वर्षांपासून काम करत आहे. या प्रकल्पाचे नियोजन अत्यंत गुप्त पध्दतीने केले गेले आहे जेणेकरून त्यासंबंधी कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.