भाजप शिवसेनेच्या महायुतीमुळे निर्माण झालेल्या मुख्यमंत्री पदाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत माझ्याकडे पदभार द्या, अशी अनोखी मागणी बीडमधील एका तरूणाने राज्यपालांकडे केली आहे. जाणून घेऊया काय आहे नेमकं या पत्रात..
प्रति,
मा . राज्यपाल साहेब,
महाराष्ट्र राज्य मुंबई
मार्फत
मा. जिल्हाधिकारी साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
विषय- महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना यांचा मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटेपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा पदभार मिळणे बाबत..
महोदय,
उपरोक्त विषयान्वये मी आपणास विनंती करतो कि, मी किसानपुत्र श्रीकांत विष्णू गदळे मु.पो. दहिफळ वडमाऊली ता. केज जि बीड(मो.नं. 7798607054) येथील रहिवाशी असून, मी गेल्या 10 ते 12 वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणामध्ये अग्रेसर आहे.
शेतकरी गोरगरिबांच्या प्रश्नावर सातत्याने काम करीत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे याठिकाणचा शेतकरी, सर्वसामान्य वर्ग चिंतेत असताना, एकीकडे भाजप व शिवसेना यांच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा निर्माण झाल्यामुळे या महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग व सर्वसामान्य वर्ग अडचणीत सापडला आहे. राज्यातील जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात यावा.
म्हणून महाराष्ट्राचे मा. राज्यपाल साहेबाना विनंती करतो कि, भाजप-शिवसेना मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्रीपदाचा पदभार देण्यात यावा, जेणेकरून मी शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवील आणि त्यांना न्याय देईल असा मी विश्वास देतो.
मा. साहेबांनी माझ्या निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी देत आहे.
आपला विश्वासू
श्रीकांत विष्णू गदळे
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.