राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाहीये. भाजप मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच राहणार असल्याचे ठामपणे सांगत आहे तर शिवसेना देखील अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा यावर ठाम आहे.
तर काँग्रेसने हा भाजप शिवसेनेचा घोळ न मिटल्यास शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. काँग्रेसचे राज्यातील नेते शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल असून जर शिवसेनेकडून प्रस्ताव आला तर केंद्रीय नेतृत्वाशी याविषयी चर्चा केली जाणार आहे.
राज्यातील हा सत्ता स्थापनेचा घोळ मिटला नसताना भाजप शिवसेनेचे संभाव्य मंत्री असलेली एक मोठी यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या यादीमध्ये भाजपच्या २४ तर सेनेच्या १८ मंत्र्यांना स्थान देण्यात आलं आहे.
या यादीमध्ये असलेली नाव धक्कादायक आहेत. भाजप शिवसेनेचा अजून फॉर्मुला ठरलेला नसताना या यादीत मात्र सेनेला १८ मंत्रिपद देण्यात आली आहेत. काही नाव अपेक्षेप्रमाणे या यादीत घेतलेली आहेत तर काही नावं हि आश्चर्यकारक आहेत.
व्हायरल झालेल्या या यादीत आदित्य ठाकरे यांचा देखील समावेश आहे. तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांचे देखील शिवसेनेच्या संभाव्य मंत्री म्हणून उल्लेख आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह रवींद्र वायकर, दीपक केसरकर, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे अशी विद्यमान किंवा दिग्गज नेत्यांची नावं या यादीत आहेत.
जाणून घेऊया कोणते आहेत शिवसेनेचे यादीतील १८ मंत्री-
आदित्य ठाकरे, मुंबई, रविंद्र वायकर, मुंबई, दीपक केसरकर, सिंधुदुर्ग, रामदास कदम, रत्नागिरी, सुभाष देसाई, मुंबई, दिवाकर रावते, मुंबई, एकनाथ शिंदे, ठाणे, मनिषा कायंदे, मुंबई, प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद, सुनील प्रभू, मुंबई, आशिष जैस्वाल, रामटेक, बच्चू कडू, अमरावती, संजय राठोड, यवतमाळ, गुलाबराव पाटील, जळगाव, डॉ. राहुल पाटील, परभणी, तानाजी सावंत, सोलापूर, ज्ञानराज चौगुले, उस्मानाबाद, प्रकाश आबिटकर, कोल्हापूर.
शिवसेनेच्या या व्हायरल झालेल्या यादीतील काही नावं वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. हि यादी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
भाजपचे यादीतील २४ संभाव्य मंत्री कोण?
सुधीर मुनगंटीवार, मंत्रीपद किंवा विधानसभा अध्यक्ष, गिरीश महाजन, जळगाव, चंद्रकांत पाटील, पुणे, आशिष शेलार मुंबई, जयकुमार रावल, धुळे, रविंद्र चव्हाण, ठाणे, परिणय फुके, नागपूर, समीर मेघे, वर्धा, अशोक उइके, यवतमाळ, रामदास आंबटकर, वर्धा, मदन येरावार, यवतमाळ, राजेंद्र पटणी, वाशिम, श्वेता महाले, बुलडाणा, डॉ. राहुल आहेर, नाशिक, अतुल सावे, औरंगाबाद, किसन कथोरे, ठाणे, राहुल नार्वेकर, मुंबई, सुनील राणे, मुंबई, गीता जैन, मुंबई, सुरेश खाडे, सांगली, मेघना बोर्डीकर, परभणी, अभिमन्यू पवार, लातूर, महादेव जानकर, पुणे, सदाभाऊ खोत, सांगली.
हि सर्व यादी वाचून हे अशक्य आहे असे तुम्हाला वाटेल. पण राजकारणात काहीही होऊ शकतं. त्यामुळे कोणाला मंत्रीपदी संधी मिळते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.