निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटत आला आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेच्या घडामोडीना वेग आला आहे. सत्ता स्थापनेसाठी महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. सेना ५०-५० च्या फॉर्मुल्यावर ठाम असून भाजप सेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाहीये.
राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असा दावा करीत भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रीपदांची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली होती. पण उद्धव ठाकरे यांनी आज असा कुठलाही प्रस्ताव आला नाही असे स्पष्ट केले आहे.
शिवसेनेकडून महत्वाच्या खात्यांची मागणी होत आहे अशी चर्चा होती. पण मुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडेच राहतील असेही भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
भाजपकडून वारंवार मुख्यमंत्रीपदाचा कुठलाही फॉर्मुला ठरला नाही असे सांगण्यात येत आहे. मात्र फॉर्मुला ठरला होता अन सर्व ठरल्याप्रमाणे होणार असेल तर शिवसेना आजही स्थिर सरकार देण्यासाठी तयार असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे.
भाजप शिवसेनेमधील मुख्यमंत्रपदाचा वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. तर दोन्ही पक्षाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेची भूमिका हि विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचे म्हंटले होते.
मुनगंटीवार यांच्या मते मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच-
संजय राऊत यांनी शिवसेनेला देखील मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा मिळावा असे सांगितले आहे. शिवसेनेकडून अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणीही करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच असल्याचे सांगितले आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे. ते म्हणाले देवेंद्र फडणवीस हे देखील एक शिवसैनिक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपद एका शिवसैनिकालाच मिळत असून ते शिवसेनेकडेच आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.