या वर्षी सर्वात जास्त वायरल राहिलेले गाणे आहे केसावर हे, यामध्ये वापरण्यात आलेली भाषा खानदेशी असून या गाण्याने महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. परंतु याच गाण्यातील नायक बबल्या ने असा कारनामा केला आहे कि चांगल्या चांगल्याची झोप उडाली आहे.
बबल्या उर्फ विक्रम अन्ना सुरवाडे सदर व्यक्तीचे खरे नाव आहे. महाराष्ट्रात त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली पण याच बबल्याने आता केसाने ग ळा कापला आहे असे ध्यानात आले आहे. तर हा बबल्या मुळचा जामनेर तालुक्यातील वाकी खुर्द या गावचा रहिवासी आहे. बबल्याचे आत्ता वय ३२ वर्ष आहे आणि त्याच्या विरोधात जामनेर स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आलेला आहे.
बबल्या ने एका मुलीला पळून नेलेले आहे. बबल्या चे वय ३२ वर्ष असून ज्या मुलीला पळून नेले तिचे वय १७ वर्ष एवढे आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळून नेणे असे गुन्हे त्याच्यावर लावण्यात आलेले आहे.
सदर मुलगी हि अल्पवयीन असून तिला फूस लावून पळून नेल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे यामुळे बबल्या वर कलम ३६३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश इंगळे या प्रकरणाचा तपास करत आहे.
या घटनेची मोठ्या प्रमाणात तालुक्यात चर्चा होत आहे. ग्रामीण चालीतील या गाण्याने सुरवाडे याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळून दिली परंतु हि प्रसिद्धी त्याच्या पचनी नाही पडली असे दिसत आहे.
अन्ना सुरवाडे याने अल्पवयीन मुलीला प ळून नेल्याने त्याचे प्रतिसाद सर्व तालुक्यात पडतील असे चित्र सर्वत्र दिसत आहे. प्रसिद्धी सोबत ती पचविण्याची शक्ती सर्वाना मिळत नाही हे या गोष्टीवरून अधोरेखित होत आहे.
“फुगे घ्या फुगे” म्हणून या बबल्याने केसावर फुगे लावले हे नक्की आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.