महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि हालचाल सत्तास्थापनेची वाढली आहे. यामध्ये सर्व महाराष्ट्रात आदित्य ठाकरे याचं नाव चर्चेत असताना या व्यतिरिक्त काही नाव सर्वात पुढे आहे यापैकी एक आहे सुभाष देसाई परंतु त्यांच्या विषयी अनेकांना माहिती नाही आहे.
शिवसेना नेते श्री. सुभाष देसाई यांचा जन्म १२ जुलै १९४२ रोजी कोकणातील मालगुंड या गावात झाला. गोरेगाव ही त्यांची कर्मभूमी. समाजकारणाची आणि राजकरणाची सुरुवात त्यांनी गोरेगावमधूनच केली. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे, कल्पकतेमुळे ते गोरेगावात लवकरच लोकप्रिय झाले.
१९ जून १९६६ रोजी माननीय शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी मा. शिवसेनाप्रमुखांनी प्रचंड मोठी आघाडी उभारली होती. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थावर भव्य मेळावा भरला. शिवसेनाप्रमुखांच्या मुंबईभर घणाघाती भाषणे, विराट सभा, भाषणे होत होती.
लक्षावधी तरुणांप्रमाणेच सुभाष देसाई देखील बाळासाहेब ठाकरे या वादळाकडे ओढले गेले. बाळासाहेबांच्या नेतृत्वाने, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९७२ साली सुभाष देसाई यांनी ’प्रबोधन गोरेगाव’ संस्थेची स्थापना केली. शिवसेनाप्रमुखांनी श्री. सुभाष देसाईंकडे संघटनेच्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविल्या. गोरेगावच्या विकासाचा ध्यास त्यांनी सतत घेतला आणि तो केला देखील. त्यामुळेच आज समाजवादी नेत्या मृणाल गोरेंचे गोरेगाव हे सुभाष देसाईंचे गोरेगाव म्हणून लोक ओळखू लागले.
फडणवीस सरकारच्या काळात सुभाष देसाई यांनी उद्योगमंत्री हा पदभार सांभाळला आहे. उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक म्हणजे सुभाष देसाई यांची ओळख आहे. बाळासाहेब यांच्या पासून ते आता पर्यंत देसाई हे शिवसेनेसोबत एकनिष्ठाने काम करत आहेत. मुंबईतील महत्वाचा चेहरा म्हणून देसाई यांचे नाव आवर्जून घेतले जाते.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.