महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अनेक अर्थानं वेगळी ठरली. या निवडणुकीत सत्ताधारी, विरोधक, माध्यमं आणि आयाराम गयाराम सर्वांचेच डोळे उघडले. महाराष्ट्राचे जनतेने पुन्हा एकदा आपल्याला कोणीही गृहीत धरू नाही असा निकाल दिला. या निवडणुकीत भाजप सेनेच्या ८ मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला.
प्रा. राम शिंदे, पंकजा मुंडे या भाजपच्या दिग्गज मंत्र्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यांचा पराभव सर्वाना धक्का देणारा होता. प्रा. राम शिंदेंना शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी धूळ चारली तर पंकजांना त्यांचेच चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी पराभूत केले.
धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष महाराष्ट्रासाठी नवीन नाही. या निवडणुकीत परळीतील राजकारण चांगलेच तापले होते. अनेक आरोप प्रत्यारोप या निवडणुकीत बघायला मिळाले. चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी ३० हजार मताधिक्याने पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव केला. धनंजय मुंडे यांचे नाव आता विरोधीपक्षनेते पदासाठी चर्चेत आले आहे.
पण याच दरम्यान निवडणुकीच्या धामधुमीत त्यांना फ्लॅटच्या जप्तीची कारवाई झेलावी लागली आहे. धनंजय मुंडे यांच्या पुण्यातील मॉडेल कॉलनीतील युगाई ग्रीन सोसायटीतील फ्लॅटवर जप्ती बँकेने जप्ती आणली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी बँकेची कारवाई म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. मी निवडणुकीच्या धावपळीत असल्याने, निवडणुकीनंतर बँकेची थकीत रक्कम भागवेन असं कळवलं होतं, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.
धनंजय मुंडे यांच्या फ्लॅटवर शिवाजीराव भोसले बँकेचे कर्ज आहे. त्यांनी जवळपास १ कोटी ४३ लाख रुपये थकवल्याचं बँकेचं म्हणणं आहे. पुण्यातील एका वृत्तपत्रात शुक्रवारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीत धनंजय मुंडेंच्या मॉडेल कॉलनीतील युगाई ग्रीन सोसायटीतील फ्लॅटवर जप्ती केल्याचं बँकेने सांगितले.
नुकतीच शिवाजीराव भोसले बँकेवर बुडीत कर्ज वाढल्याने रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले होते. या बँकेवर संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार असलेले अनिल भोसले यांची हि बँक होती.
धनंजय मुंडे यांनी हि जप्ती राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या फ्लॅटचा व्यवहार अनिल भोसले आणि त्यांच्यामध्ये असल्याचे सांगितले आहे. दोघांनी मिळून हा फ्लॅट घेतला होता. धनंजय मुंडेंनी त्यांच्या वाट्याचं कर्ज फेडलं असून अनिल भोसले यांच्या वाट्याची रक्कम भरायची बाकी आहे असे त्यांनी सांगितले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.