या विधानसभा निवडणुकीत उमेदवार आपल्या प्रचारासाठी वेगवेगळे गोष्टी वापरत होते. यामध्ये कोणी स्टार प्रचारक आणत तर काहींनी सिनेस्टारची मदत घेतली. परंतु चन्द्रपूर मधील चिमूर येथील उमेदवार एका वेगळ्या कारणाने चर्चेत राहली ती म्हणजे तिने दिलेली निवडून आल्यावर करायच्या कामाची घोषणा,
ज्या जिल्ह्यात दारुबंदी आहे, त्याच जिल्ह्यात या उमेदवाराने दारुला उघड समर्थन दिलं होत. चिमूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी थेट जाहीरनामा प्रकाशित करत दारुला समर्थन दिले. त्यांनी ‘गाव तिथे बियर बार’ अशी घोषणा देत प्रचाराचा बार उडवला होता.
बेरोजगार तरुणांना दारु विक्रीचे परवाने, गाव तिथं बिअर बार, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सवलतीत दारु असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यांचा हा व्हिडीओ महाराष्ट्रात तुफान गाजला होता आणि whatsapp आणि फेसबुकवर हा तुफान फिरत होता.
चिमूर मध्ये बंटी भांगडिया या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे त्यांना मिळालेली मतदान संख्या ८६,८५२ एवढी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी एक पत्रक काढलं, त्यात ही सर्व आश्वासनं देण्यात आली होती.
चिमूर तालुक्यातील पेंढरी या गावातील वनिता राऊत या उमेदवार आहेत. आता त्यांच्या या द्रवीय जाहिरनाम्याला मतदार किती मनावर घेतले हा आकडा समोर आलेला आहे. तर त्यांना इथे तब्बल २८६ एवढे मते मिळाली आहे. अखिल भारतीय मानवता पक्षाच्या त्या उमेदवार होत्या.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता