हि निवडणूक आयाराम गयाराम साठी विशेष होती कारण भाजपा शिवसेनेत मोठ्या प्रमाणात कॉंग्रेस आणि एनसीपी मधून उमेदवार बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात गेले होते. परंतु या सर्वाचे झाले काय हे आपणास अनेकास माहिती नाही. त्याविषयी आपण आता माहिती बघूया.
उदयनराजे भोसले हे महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत राहिलेले नाव आहे कारण नुकतेच ते खासदार निवडून आले होते आणि त्यांनी ४ महिन्या मधेच बीजेपी मध्ये प्रवेश केला होता. त्याच्या विरुद्ध शरद पवारांनी श्रीनिवास पाटील यांना निवडणुकीत उतरविले होते आणि इथे उदयन राजे यांचा पराभव झाला आहे.
इंदापूर येथून बीजेपी कडून निवडणुकीत असलेले हर्षवर्धन पाटील हे कॉंग्रेस मधून बीजेपी मध्ये गेले होते त्यांचा एनसीपीच्या दत्तात्रय मामा भरणे यांनी पराभव केलेला आहे. बारामती व इंदापूर लगत असल्याने इथल्या निकाला कडे सर्वाचे लक्ष लागले होते.
बीड मधून जयदत्त क्षीरसागर यांनी एनसीपीई मधून शिवसेनेत प्रवेश केला होता काका पुतण्याच्या या लढाईत संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारलेली दिसत असून जयदत्त यांचा बीड मधून पराभव झाला आहे.
दिलीप सोपल यांनी एनसीपी ला रामराम करून शिवसेनेत प्रवेश केला होता. बार्शी मतदार संघातून त्यांनी हि निवडणूक लढवली होती आणि इथे अपक्ष उमेदवार राजेंद्र राउत यांचा विजय झाला आहे. इथे देखील बंडखोराना फटका बसला आहे.
रश्मी बागल यांनी देखील एनसीपी मधून शिवसेने मध्ये प्रवेश केला होता. या करमाळा मतदार संघात अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने पाठींबा दिला होता. नारायण पाटील आमदार तिकीट कापून तिकीट दिलेले बागलला देण्यात आले होते. इथे रश्मी बागल यांचा पराभव झाला आहे.
दिलीप माने सोलापूर मध्ये कॉंग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता त्यांना देखील इथे फटका बसला आहे. प्रणिती शिंदे यांचा सोलापूर मध्ये विजय झालेला आहे. राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केलेले पांडुरंग बरोरा यांचा तब्बल 15 हजार 016 मतांनी पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा यांनी त्यांचा पराभव केलेला आहे.
वैभव पिचड हे आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र यांनी एनसीपी सोडून भाजपात प्रवेश केला होता त्यांचा देखील राष्ट्रवादीचे डॉ.किरण लहामटे यांनी भाजपचे वैभव पिचड यांना पराभूत केले आहे. अकोले मतदार संघात हि लढाई बघायला मिळाली.
श्रीरामपूर भाऊसाहेब कांबळे कॉंग्रेसचा आमदार होते त्यांनी या वेळेस शिवसेनेत प्रवेश केला होता त्यांचा देखील लहू नाथा कानडे कॉंग्रेसच्या उमेदवाराने पराभव केला आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता